नाशिक : नाशिकमधील काही सराफ व्यवसायिकांवर आयकर विभागाच्या धाडी (Income Tax Raid) सुरु असून दुकाने आणि घरांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. सराफ व्यावसायिकांनी व्यवहारांची माहिती लपवण्याचा संशयावरून ही कारवाई केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात आयकर विभागामार्फत विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. आज नाशिकमध्ये (Nashik News) सराफ व्यावसायिकांवर धाडी पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सराफ व्यावसायिकांकडून व्यवहारांबाबत माहिती लपवली जात असल्याचा संशय आयकर विभागाकडून व्यक्त होत आहे.
सराफ व्यावसायिकांची दुकाने आणि घरांची तपासणी
नाशिकच्या कॅनडा कॉर्नर (Canada Corner Nashik) भागात छापेमारी केली जात आहे. आज सकाळपासून ही कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहेत. तब्बल 39 वाहनांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी आल्याची माहिती मिळत आहे. सकाळपासून अधिकारी कार्यरत आहे. नाशिकमधील काही सराफ व्यावसायिकांची दुकाने आणि घरांची तपासणी केली जात आहे. नाशिकमध्ये आयकर विभागाची ही एक मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. आता या कारवाईत पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या