Nagpur News नागपूर: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  जे.पी. नड्डा (J P Nadda) आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठी त्यांचे काल शनिवारच्या रात्रीच नागपूर विमानतळावर आगमन झाले असून आज ते राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (RSS) प्रतिनिधी सभेला उपस्थित राहणार आहे. नागपूरातील (Nagpur News)रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या सभेत संघाच्या सरकार्यवाहपदी कोण असेल याची घोषणा होण्याची शक्यता आहे. नागपूरात दर तीन वर्षांनी संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा होत असते. यात विविध महत्वाच्या मुद्यांवर चिंतन आणि चर्चा करण्यात येत असते. सोबतच सरकार्यवाह पदाची देखील निवड करण्यात येते. या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा हे या सभेला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.  


स्वयंसेवक संघाच्या सभेला लावणार हजेरी


राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या वतीने अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे नागपूरात आयोजन करण्यात आले आहे. नागपूरातील रेशीमबाग मैदानात 15 ते 17 मार्च दरम्यान या प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिनिधी सभेचा आजचा शेवटचा दिवस असून आजच्या सभेत संघाच्या सरकार्यवाहपदी कोण असेल याची घोषणा होण्याची शक्यता आहे. नागपूरात दर तीन वर्षांनी संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा होते. या सभेत चर्चा करून सर्वांनुमते सरकार्यवाह यांची निवड करण्यात येते. यंदाही तीच परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे. आजच्या सभेच्या पहिल्या सत्रात सहकार्यवाह निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.


दरम्यान, सरकार्यवाह म्हणून दत्तात्रय होसबळे पुन्हा कायम राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. तर  सहकार्यवाहक डॉ. मनोहर वैद्य यांना बढती मिळण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असताना, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या या प्रतिनिधी सभेला विशेष महत्व प्राप्त झाले असून या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील या कार्यक्रमाला विशेष हजेरी लावणार आहे. 


नागपूरात दर तीन वर्षांनी संघाची प्रतिनिधी सभा


संघाच्या वार्षिक प्रतिनिधी सभेला आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डासह देशभरातील 1529 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी मध्य भारतातील युवकांना जोडण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने उपराजधानी नागपूरात 4 मार्चला राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महासंमेलनाला प्रामुख्याने जे.पी.नड्डा उपस्थित राहणार होते. मात्र काही कारणांमुळे त्यांचा संभाव्य दौरा ऐनवेळी रद्द झाला होता. त्यामुळे आज नड्डा हे या प्रतिनिधी सभेसह नागपूर भाजपच्या पदाधिकारी आणि काऱ्याकर्त्यांना देखील मार्गदर्शन करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. काल रात्री जे.पी.नड्डा यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी मोठ्यासंख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर आज संघाच्या वार्षिक प्रतिनिधी सभेला जे.पी.नड्डा आपली हजेरी लावणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या