Sheep and Goat Development Corporation : शेळी आणि मेंढी पालन करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या (Punyashlok Ahilya Devi Maharashtra Sheep and Goat Development Corporation) भाग भांडवलात चौपट वाढ करण्यात आली आहे. महामंडळाचे भाग भांडवल 25 कोटी रुपयांवरुन 99.99 कोटी रुपये झाले आहे. राज्यातील शेळी, मेंढी पालन करणाऱ्यांच्या उत्कर्षासाठी शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. याला अखेर यश आलं आहे.
शेळी, मेंढी पालन करणाऱ्यांच्या विकासाला गती मिळणार
राज्यातील शेळी, मेंढी पालकांचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाला बळकटी देण्यासाठी महामंडळाच्या भाग भांडवलात चौपट वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे महामंडळाचे भागभांडवल 25 कोटी रुपयांवरुन तब्बल 99.99 कोटी रुपये करण्यात आले आहे. महामंडळाचे भागभांडवल वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ झाल्यामुळे शेळी, मेंढी पालन करणाऱ्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. दरम्यान, मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
भागभांडवल 25 कोटी रुपयांवरुन 99.99 कोटी रुपये
राज्यातील शेळी, मेढी पालकांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी त्यांच्या परंपरागत शेळी, मेंढी पालन व्यवसायास तांत्रिक ज्ञान प्राप्त करून देणे, व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नास अधिक भाव मिळवून देण्याबरोबरच त्यांचा उत्कर्ष व सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील शेळी, मेंढ्यांच्या उच्च उत्पादन क्षमता असलेल्या स्थानिक प्रजातीमध्ये सुधारणा करणे, त्यांचे संवर्धन करणे, त्यांची संख्या वाढवणे, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, आरोग्य विषयक सुविधा तसेच बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेजेस उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबवण्यात येत आहेत. या योजनांना आणि उपक्रमांना गती देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाच्या भागभांडवलात 25 कोटी रुपयांवरुन 99.99 कोटी रुपये इतकी भरीव वाढ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी, मेंढी महामंडळाचे भागभांडवल वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच अनेकांनी प्रयत्न केले होते. त्यामध्ये माजी मंत्री तथा विद्यमान आमदार आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरावती येथील संतोष महात्मे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
महत्वाच्या बातम्या: