एक्स्प्लोर
नागपूर मेट्रोचा इंटर्नल ट्रायल रन यशस्वी

नागपूर : मुंबईपाठोपाठ नागपूरमध्येही लवकरच मेट्रो धावणार आहे. नागपूर मेट्रोचा ट्रायल रन काल शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास मिहान डेपो ते एअरपोर्टपर्यंत घेण्यात आला. हा नागपूर मेट्रोचा इंटर्नल ट्रायल रन होता. नागपूरमध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्याचाच ट्रायल रन काल शनिवारी घेण्यात आला. खापरी परिसरातील मिहान डेपोजवळ सुमारे 5 किमीचा हा ट्रायल रन होता. हा इंटर्नल ट्रायल रन असल्यानं त्यात केवळ अधिकारी आणि कर्मचारीच उपस्थित होते. नागपूर मेट्रोचं पहिल्या टप्प्यात मिहान डेपो ते ऑटोमोटिव्ह चौक मार्गाचं काम वेगानं सुरु आहे. या मार्गाचं काम पूर्णत्वाकडे असून लवकरच नागपूर मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
स्पेशल रिपोर्ट : नागपूर मेट्रो निर्मितीचा 'जलद ' आणि 'स्वस्त ' प्रवास
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















