Nagpur : केंद्रीय मंत्री आणि विद्यामन खासदार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपला प्रचाराचा नारळ फोडत स्वत: मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे. ‘कहो दिल से, नितीन गडकरी फिर से’ म्हणत नागपूर भजाप तर्फे नितीन गडकारींना तिसऱ्यांदा खासदार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यात आता नितीन गडकरी यांनी देखील आपली जोरदार तयारी केल्याचे चित्र आहे.  


लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha 2024) पडघम वाजायला सुरुवात होण्यास आता अवघ्या काहीच तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. समाज माध्यमांवर सध्या सुरू असलेले विविध सर्व्हे आणि मतदारांचा कौल बघता यावेळी कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यात भाजपविरुद्ध (BJP) सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यामुळे भाजपची काही अंशी दमछाक होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक दिग्गज नेते हे स्वत: मैदानात उतरून प्रचार-प्रसार करत आहे.


‘कहो दिल से, नितीन गडकरी फिर से’


बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होताच, त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा नागपूरमधून उमेदवारी देण्यात आल्याने नागपूर भाजपमध्ये मोठा आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. यंदा सलग तसऱ्यांदा गडकरी हे नागपूर लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. गडकरी यांना नागपूरच्याच गडाचे तिकीट मिळाले असल्याने त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला असून नागपूर भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अशातच  भाजपतर्फे नितीन गडकरी यांना  मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जोरदार तयारी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.


यावेळी गडकारींनी स्वत: मैदानात उतरून आपला प्रचाराचा नारळ फोडला आहे. ‘कहो दिल से, नितीन गडकरी फिर से’ अशा आशयाचा मजकूर असलेल्या स्प्रे पेंटिंगचे अनावरण गडकरी यांनी केले आहे. नागपूरसह देशभरात गडकरी यांनी गेल्या दहा वर्षांत केलेले विकासकार्य आणि राजकारण विरहित लोककल्याणकारी निर्णयामुळे त्यांची प्रतिमा देशपातळीवर उंचावली आहे. अशातच त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यास विरोधी पक्षात अद्याप कोणीही फार इच्छुक नसल्याचे देखील बोलले जात आहे. सोबतच नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी देखील नागपूरकरांनी केली आहे.  


निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी 


नागपूरातील इतर विरोधीपक्षानी नितीन गडकरी यांच्या विरोधात कुठलाही उमेदवार उभा न करता देशात एक नवा आदर्श उभा करावा. तसेच विकासासोबत सर्वसामान्य जनता कायम उभी असते, हा संदेश देखील या माध्यमातून द्यावा, अशी आग्रही मागणी नागपूरकरांनी केली आहे. या मागणीसाठी नागपूरकर रस्त्यावर उतरून मोहीम राबवत आहेत. या मोहिमेंतर्गत शहरातील मुख्य चौकात हातात 'नागपूरची शान असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बिनविरोध निवड का नाही,' असा आशय असलेला बॅनर घेत आपली भावना व्यक्त करण्यात येत आहे. तसेच इतर राजकीय पक्षांनीही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती देखील या नागरिकांनी या मोहिमेतून केली आहे.


नितीन गडकरींमुळे नागपूरात अनेक संस्था आल्या, विकासाची मोठी कामं झाली, यासह त्यांनी देशभरात केलेली विकासाची कामे बघता विकासाच्या आड राजकारण कधीही येऊ न दिल्याने त्यांची प्रतिमा देशभर विकासपुरुष अशी आहे. त्यामुळे राजकरणांपेक्षा विकासाला सर्वस्वी मानणाऱ्या नितीन गडकरी यांची निवड बिनविरोध व्हायला हवी, अशी मागणी नागपूकरांनी केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या