पुणे : बारामती लोकसभेची चर्चा आणि या लोकसभेच्या (Baramti Loksabha Constituency) उमेदवाराची राज्यभर चर्चा सुरु आहे. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तगडी लढत होणार असल्याची चर्चा असताना विजय शिवतारेंनी  (Vijay Shivtare)  अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्धार केला. त्यामुळे राज्यात बारामती लोकसभेची चर्चा पुन्हा वाढली. त्यातच आता विजय शिवतारे यांची मंत्री दीपक केसरकर आणि खासदार राहुल शेवाळे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं घोषित केलं. त्यानंतर मुख्यमंत्री यांची विजय शिवतारे यांनी भेट घेतली. 


मुख्यमंत्री यांची गुरुवारी भेट घेतल्यानंतर आज शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मंत्री दीपक केसरकर आणि राहुल शेवाळे पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी विजय शिवतारे आणि केसरकर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. विजय शिवतारे हे दौंडच्या दौऱ्यावरती होते परंतु दौरा मध्येच सोडून विजय शिवतारे पुण्याकडे रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन एक मंत्री आले असल्याची बातमी आली त्यामुळे विजय शिवतारे यांना संध्याकाळी हा दौरा अर्धवट सोडून पुण्याला जावं लागलं. रात्री उशिरा केसरकर आणि शेवाळे यांनी विजय शिवतारे यांचे रुग्णालयात भेट घेतली. शिवातरेंना डायलिसीस करावं, लागतं. ते डायलिसीस करायला गेले असताना दोघांनी भेट घेतल्याची माहिती आहे. 


विजय शिवतारे यांची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न?


विजय शिवतारेंच्या निर्णयामुळे बारामतीत अजित पवारांना मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर विजय शिवतारेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठकीसाठी बोलवलं होतं. यावेळी शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी थांबवून ठेवलं. या तासाभराच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला. शिवाय महायुतीत ज्याला उमेदवारी मिळते त्याच्यासाठी काम करायचं, अशी समज मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर थेट आता मंत्री दीपक केसरकर आणि राहुल शेवाळे यांनी शिवतारेंची भेट घेतली.  या भेटीत नेमकी कशासंदर्भात चर्चा केली. या संदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आली नाही आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता. शिवतारेंनी जर बारामतीत माघार घेतली नाही तर याचा फटका थेट अजित पवारांना बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिवतारेंची समजूत काढायला आले असावेत, अशी शक्यता आहे. विजय शिवतारे यांची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Baramati Lok sabha 2024 : अजित पवारांच्या थेट सभास्थळावर पोस्टर वाॅर! विजय शिवतारेंनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं!