Nagpur News : सालवा रेल्वेस्थानकाला तिसरी लाईन संलग्न करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे कामाची पूर्वतयारी झाली आहे. सहा ते नऊ नोव्हेंबर 2022 दरम्यान राजनांदगाव- कळमना रेल्वे मार्गावरील सालवा रेल्वेस्थानकावर हे काम केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील इतवारी इतवारी-रिवा एक्स्प्रेससह पंधरा रेल्वेगाड्या रद्द (Train Cancelled) करण्यात आल्या आहेत. कामामुळे 6 रेल्वेगाड्या अर्ध्यावरच थांबणार आहेत, तर 9 रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे.
'या' रेल्वे गाड्या रद्द
रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये कोरबा- इतवारी एक्स्प्रेस, इतवारी- कोरबा एक्स्प्रेस, बिलासपूर इतवारी इंटरसिटी एक्स्प्रेस, इतवारी-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस, रीवा-इतवारी एक्स्प्रेस, इतवारी-रीवा एक्स्प्रेस, गोंदिया- इतवारी मेमू, इतवारी- गोंदिया मेमू, रायपूर - इतवारी स्पेशल पॅसेंजर, इतवारी- रायपूर स्पेशल पॅसेंजर, तिरोडी-इतवारी पॅसेंजर, इतवारी तिरोडी पॅसेंजर, दुर्ग- गोंदिया मेमू स्पेशल, गोंदिया-दुर्ग मेमू स्पेशल आणि बिलासपूर- कोरबा पॅसेंजरचा समावेश आहे.
अर्ध्यातच थांबणाऱ्या गाड्या
सहा ते आठ नोव्हेंबरला धावणारी मुंबई गोंदिया एक्स्प्रेस (mumbai gondia express) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (मुंबई) गोंदिया एक्स्प्रेस (csmt gondia vidarbha express) नागपूरपर्यंतच धावेल. गोंदिया मुंबई आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (मुंबई) गोंदिया एक्स्प्रेस गोंदियाऐवजी , नागपूर रेल्वेस्थानकावरून मुंबईसाठी पुढे निघेल. 6 ते 8 नोव्हेंबरला ' धावणारी टाटानगर इतवारी एक्स्प्रेस आणि 7 ते 9 नोव्हेंबरला इतवारी टाटानगर एक्स्प्रेस गोंदिया येथून रवाना होईल.
या गाड्या धावणार दुसऱ्या मार्गाने
बिलासपूर - भगत की कोठी एक्स्प्रेस, बिकानेर- बिलासपूर एक्स्प्रेस, कोरबा अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस, अमृतसर कोरबा छत्तीसगड एक्स्प्रेस हावडा मुंबई दुरंतो एक्स्प्रेस, मुंबई हावडा दुरंतो एक्स्प्रेस, पुणे हावडा दुरंतो न एक्स्प्रेस, कुर्ला शालिमार एक्स्प्रेस आणि शालिमार कुर्ला एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचे मार्ग 6 ते 9 नोव्हेंबर ई या कालावधीसाठी बदलविण्यात आले आहे.
तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 24 दलालांवर कारवाई
सणासुदीच्या काळात रेल्वेच्या तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्यांकडे रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) पथकांनी छापेमारी करुन 24 दलालांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 5 लाख 65 हजारांच्या रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली. नागपूर, वर्धा, चंद्रपूरसह आठ रेल्वेस्थानकावर ही छापेमारी करण्यात आली. आरपीएफच्या कारवाईत नागपूरमधून 6, अजनी येथून 5, वर्धा येथून 1, चंद्रपूरमधून 5, बैतुल मधून 3, आमलामधून 1, बल्लारपूरमधून 2, छिंदवाडामधून 1 अशा एकूण 24 दलालांवर कारवाई केली.
महत्त्वाची बातमी