Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी-गडहिंग्लज मार्गावर लाकूडवाडी घाटात चारचाकी वाहनातून लपवून नेत असलेला 4 लाख 61 हजारांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा तसेच वाहनासह 10 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने केली.  भरारी पथकाला संशयित सागर ठाकूर (रा. साठेली, सिंधुदुर्ग) व प्रदीप गावडे (कैरी, सिंधुदुर्ग) हे नेसरी गडहिंग्लज मार्गावरून पुढे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. संशयितांकडे असलेले चारचाकी वाहन पथकाने थांबण्याचा इशारा करून थांबले नाही. त्यांनी पहाटेचा अंधार असल्याने वाहन सोडून पलायन केले.


भरारी पथकाने पाहणी केली असता या वाहनात 180 व 750 मिलीमधील विविध ब्रँड्सचे 74 बॉक्स सापडले. बाजारभावाने त्यांची किंमत 4 लाख 61 हजार व चारचाकी वाहनाची किंमत 6 लाख असा 10 लाख ६१1 हजारांचा मुद्देमाल भरारी पथकाने जप्त केला. 


कोल्हापुरात तब्बल साडे तीन कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त


कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना जेरबंद करत तब्बल 3.41 कोटी रुपये किमतींची 3 किलो 413 ग्रॅम व्हेल माशाची उलटी (Ambergris also known as Whale Vomit) जप्त केली. प्रदीप शाम भालेराव (वय 36, रा. मुंबई, चेंबूर), शकील मोहन शेख (वय 34, रा. येरवडा, पुणे) आणि अमीर हाजू पठाण (वय 32, रा. विश्रांतवाडी, पुणे) या तिघांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. संशंयितांची रवानगी गांधीनगर पोलिसांकडे करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अत्तर, सौंदर्य उत्पादने आणि औषधे बनवण्यासाठी अॅम्बरग्रीस म्हणजेच व्हेल माशाच्या उलटीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.


कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, श्रीकांत मोहीते, वैभव पाटील, विजय गुरखे, सचिन देसाई, हिंदुराव केसरे, अनिल पास्ते, दिपक घोरपडे, सोमराज पाटील, उत्तम सडोलीकर, रफीक आवळकर, वनअधिकारी रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील यांनी सहभाग घेतला.