एक्स्प्लोर

नागपुरात लग्नघराचा बँड वाजवणारी बबली गजाआड

नागपूर : रात्रीच्या अंधारात कोणाचीही नजर नसताना चोरी झाल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. मात्र दिवसाढवळ्या पाहुणचार घेऊन, लग्नघरात डल्ला मारुन पसार होणारी एक 'बबली' पाहून तुमचे डोळे पांढरे होतील. नागपुरातील विमल इंगळेच्या घरात अक्षरशः कुबेराचा खजिना सापडला आहे. महागडी घड्याळं, दुकानात नसतील इतक्या लेदर पर्स, कॉस्मेटिक्स, मोबाईल फोन्स आणि महागड्या साड्या असा सगळा मुद्देमाल विमल इंगळेंच्या घरी सापडला आहे. विमलचा कारनामा ऐकून भलेभले थक्क होतील. बाईंचा उद्योग एकच.. छान साडी नेसायची, मेकअप करायचा, सजून धजून कुणाच्याही लग्नात घुसायचं, चोरी करायची आणि रफूचक्कर व्हायचं. सगळं उत्तम चाललं होतं, पण जुलै महिन्यात राऊत कुटुंबाच्या लग्नामुळे सगळं बिंग फुटलं. पोलिस जेव्हा विमल इंगळेंच्या घरी पोहोचले, तेव्हा अख्खं कुटुंब याच धंद्यात असल्याचं उघड झालं. विमलच्या घरी सापडलेलं घबाड मांडताना अर्धा दिवस गेला. विमल इंगळे यांनी चोरीत करिअर करण्याआधी राजकारणातही हात आजमावला आहे. 2012 च्या पालिका निवडणुकीत या बाई अपक्ष म्हणून लढल्या आणि पडल्याही. विमल इंगळेनं नेमक्या किती लग्नांमध्ये पाहुण्यांचा बँड वाजवलाय, याचा आकडा उपलब्ध नाही. त्यामुळे तुमच्याही लग्नात पाहुण्यांचा ऐवज लंपास झाला असेल तर व्हिडीओ फुटेज चेक करा. कदाचित विमल इंगळेनं तुमचाही पाहुणचार घेतला असेल.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग, धाराशिवच्या वृद्ध महिलेला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा
ABP माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग, धाराशिवच्या वृद्ध महिलेला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा
Cabinet Decision : मोठी बातमी! राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय
राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
मोठी बातमी! SIT चं पथक मनोज जरांगे पाटलांच्या घरी दाखल, चौकशी केली जाणार, नेमकं प्रकरण काय? 
मोठी बातमी! SIT चं पथक मनोज जरांगे पाटलांच्या घरी दाखल, चौकशी केली जाणार, नेमकं प्रकरण काय? 

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Embed widget