नागपूर : गुन्हेगार कितीही चाणाक्ष असला तरी तो काही ना काही चूक करतोच. नागपुरातल्या समलैंगिक आरोपीच्या बाबतीतही असंच घडलं आणि पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचले.

 

 

जितू जाधव याच्यावर हत्येचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, लूटमार असे तब्बल 20 गुन्हे दाखल आहेत. तर जितूचाच भाऊ राकेश जाधव 2013 मधल्या गोलू मेश्राम हत्याकांडातील प्रमुख फरार आरोपी. या दोघांनीही पोलिसांची डोकेदुखी चांगलीच वाढवली होती. मात्र एका
फोन कॉलने पोलिसांना सुगावा लागला.

 

 

या दोन्ही गुन्हेगारांनी भोपाळमध्ये आश्रय घेऊन तिथंही आपला अवैध धंदा सुरु केला होता. पानटपरी टाकून अवैध दारुची विक्री करायचे. भोपाळहून नागपुरातील समलैंगिक मित्राशी त्याने संपर्क साधला आणि याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

 

भोपाळच्या स्थानिक पोलिसांनी सहकार्य केलं नाही, तरी छापा टाकला तेव्हा दोघं जाळ्यात आले. एका आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हाती दोन आरोपी आले.

 

 

जितूवर MPDA अंतर्गत पोलिस कारवाई होणार आहे. तर राकेश जाधवही जाळ्यात अडकल्यानं गोलू मेश्राम हत्याकांडाचा निकाल लागणं शक्य होणार आहे. तसंच या दोन्ही मार्फत इतर फरार गुन्हेगारांचाही शोध घेण्यास नागपूर पोलिसांना मदत होईल.