पुण्यात झोपडपट्टीला भीषण आग, आगीनंतर 10 सिलेंडरचा स्फोट
एबीपी माझा वेब टीम | 09 May 2016 10:02 AM (IST)
पुणे : पुण्यातील मंगळवार पेठेतील भीमनगरमधील झोपडपट्ट्यांनी भीषण आग लागली आहे. या आगीत शेकडो झोपटपट्ट्या जळून खाक झाल्याचं समजतं. शिवाजी स्टेडियमजवळील झोपडपट्टीत दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आगीदरम्यान 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याचं कळतं. त्यामुळे ही आग आणखी भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.