एक्स्प्लोर

नागपुरातील धवड दाम्पत्य 67 दिवसांपासून बेपत्ता

अपघातासंदर्भात विमा क्लेम्ससाठीचे नागपुरातील प्रख्यात वकील भैयासाहेब धवड (वय 62 वर्ष) आणि त्यांच्या पत्नी वनिता धवड 29 जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता आहेत.

नागपूर : नागपुरातील प्रख्यात वकील भैयासाहेब धवड आणि त्यांच्या पत्नी वनिता धवड गेल्या 67 दिवसांपासून बेपत्ता आहे. कुटुंबीय, शेजारी, पोलीस धवड दाम्पत्याचा शोध घेत असून त्यांच्या बेपत्ता होण्यामागचं गूढ दिवसागणिक वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे नावाजलेले वकील असलेले भैयासाहेब आणि त्यांची गृहिणी पत्नी वनिता घर सोडताना अंगावरच्या कपड्यांशिवाय कोणतीही वस्तू सोबत घेऊन गेलेले नाहीत. सर्व ओळखपत्र, एटीएम कार्ड्स, बँक पासबुक, कपडे, चप्पल एवढंच काय तर चष्मे आणि रोज आवश्यक असलेली औषधंही घरीच ठेवून हे दाम्पत्य अज्ञात ठिकाणी निघून गेल्याने नागपुरात खळबळ माजली आहे. अपघातासंदर्भात विमा क्लेम्ससाठीचे नागपुरातील प्रख्यात वकील भैयासाहेब धवड (वय 62 वर्ष) आणि त्यांच्या पत्नी वनिता धवड 29 जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता आहेत. अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत वंजारीनगर परिसरातील लक्ष्मी प्रयाग अपार्टमेंटमध्ये गेल्या 14 वर्षांपासून राहणारे हे दाम्पत्य सर्वांचे आवडते शेजारी होते. सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारे निर्व्यसनी भैय्यासाहेब आणि वनिता धवड 29 जुलैच्या संध्याकाळपर्यंत अपार्टमेंटमध्ये सर्वांना दिसले. मात्र, 29 जुलैच्या रात्री कोणाला काहीही न सांगता हे दाम्पत्य बेपत्ता झालं. ही घटना घडली त्या दिवशी धवड दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा मृणाल (वाशिमला बँकेत नोकरी करतो) नागपुरातील घरातच होता. पहिले दोन-तीन दिवस शेजाऱ्यांना काहीच समजलं नाही. मात्र, एका दिवशी अपार्टमेंटमध्ये पोलीस आले तेव्हा धवड दाम्पत्य बेपत्ता असल्याचं शेजाऱ्यांना कळलं. पोलिसांनी धवड कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत फ्लॅटची तपासणी केली, तेव्हा धवड दाम्पत्याची प्रत्येक वस्तू घरीच आढळली. घर सोडताना भैयासाहेब आणि त्यांच्या पत्नी वनिता यांनी अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच नेलेलं नाही. दोघांची सर्व ओळखपत्र (आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, इतर आयडी), बँकेचे सर्व एटीएम कार्ड्स, पासबुक त्यांनी घरीच ठेवले आहे. रोज लागणाऱ्या अत्यावश्यक औषधं, त्यांचे सर्व प्रिस्क्रिप्शन्सही नेलेलं नाही. धक्कादायक म्हणजे भैयासाहेब यांना सतत चष्मा लावायचे, मात्र तोही घरीच ठेवल्याचं आढळलं. मागील 12 वर्षांपासून शेजारी राहणारे आणि प्रत्येक सुख-दुःखात एकमेकांची साथ देणारं दाम्पत्य असं बेपत्ता झाल्याने शेजारी निराश झाले आहेत. एकुलत्या एक मुलाच्या लग्नानंतर घरात सर्वकाही आलबेल नव्हतं, एवढीच माहिती शेजाऱ्यांना आहे. गेल्या दोन महिन्यात पोलिसांनी या प्रकरणी बरीच मेहनत घेतली. नागपूरचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांनी पिंजून काढलं. इतर राज्यांच्या पोलिसांना भैयासाहेब आणि वनिता धवड यांची माहिती दिली. मात्र, दोघे कुठे गेले, त्यांच्यासोबत नेमके काय झालं, हे कळू शकलं नाही. मात्र, मुलाच्या लग्नानंतर धवड कुटुंबात काही तणाव होता, असं पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. या दाम्पत्याबद्दल काहीही कळल्यास नागरिकांनी नागपूर पोलिसांना सांगावं, असं आवाहन पोलिसांनी केले आहे. धकाधकीच्या जगात आयुष्य जगताना मध्यम वयातील अनेक दाम्पत्य विविध तणावांना सामोरे जातात. कुटुंबातील ताण तणाव, विविध पिढ्यांमध्ये वैचारिक अंतर, नोकरी व्यवसायानिमित्ताने दुरावत जाणारी मुलं, त्यामुळे येणारा एकटेपणा अशा वेगवेगळ्या कारणांनी अनेक वृद्ध दाम्पत्य नैराश्येच्या गर्तेत जातात. मात्र, सुखवस्तू आयुष्य जगणाऱ्या धवड दाम्पत्याच्या बाबतीत यापैकी नेमकं काय झालं, हे कोणालाच कळलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
Embed widget