Nagpur News : गत काही दिवसांपासून पोलिस विभागात एक पत्र वेगाने व्हायरल होत आहे. या पत्राच्या माध्यमातून पोलिस आयुक्त अमितेश कुमारसह (Nagpur Police) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याची तक्रार करण्यात आली आहे. हे पत्र मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध चौकशीही सुरू झाली आहे, मात्र विभागाच्या प्रतिष्ठेशी संबंधित प्रश्न असल्याने प्रकरणाबाबत सध्या गुप्तता पाळली जात आहे. पोलिस विभागातीलच कोणीतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह (Devendra Fadnavis) वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे पत्र लिहिल्याचा अंदाज आहे.


खंडणी विरोधी पथकाच्या या अधिकाऱ्याबाबत अत्यंत कठोर भाषेत लिहिले आहे. खंडणी प्रकरणात खंडणी विरोधी पथकाने रोशन शेख आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती. त्यानंतर रोशनवर मोक्काही लावण्यात आला. जवळपास दोन वर्षांपासून रोशन तुरुंगात आहे. सांगण्यात येते की, चौकशीदरम्यान रोशनच्या क्रेडिट कार्डने एक आयफोन खरेदी करण्यात आला होता. तो फोन प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यानेच घेतला होता. हे काम अधिकाऱ्याने एका शिपायाच्या मदतीने केले होते. त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही मिळाली.


संपत्तीच्या प्रकरणातही वसुलीची चर्चा!


प्रकरणाच्या तपासादरम्यानच गुन्हेगाराच्या पैशातून आयफोन खरेदी करणे किती गंभीर होऊ शकते हे माहिती असतानाही इतकी हिंमत करणे आश्चर्यकारकच आहे. सांगण्यात येते की, अधिकारी 2-2 तासांपर्यंत रोशनशी एकट्यात बोलत आणि चौकशी करीत होता. ज्यावेळी त्यांच्यात बोलणे होत होते कोणताही कर्मचारी तेथे उपस्थित राहू शकत नव्हता. संपूर्ण गुन्हेशाखेत याची कुजबूज सुरू होती, मात्र अधिकारी येथेच थांबला नाही. सांगण्यात येते की, कामठी मार्गावर मोहम्मद अली पेट्रोल पंपाजवळील एका संपत्तीच्या वादाचे प्रकरणही याच पथकाकडे पाठविण्यात आले होते. त्या प्रकरणातही या अधिकाऱ्याने एका पक्षाकडून मोठी रक्कम घेतल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे.


डीसीपी राजमाने यांची भीती


त्यावेळी गुन्हे शाखेचे नेतृत्व डीसीपी गजानन राजमाने यांच्या हातात होते. अधिकाऱ्याला माहिती झाले होते की, प्रकरण राजमाने यांच्या कानापर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या भीतीने अधिकारी तत्काळ वैद्यकीय रजेवर गेला. त्याच वेळी निश्चित झाले होते की, जेव्हापर्यंत राजमाने गुन्हे शाखेत राहतील तोपर्यंत परतायचे नाही. झालेही अगदी असेच. काही दिवसातच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपायुक्तस्तराच्या अधिकाऱ्यांच्या तैनातीत फेरबदल केले. तोपर्यंत हा अधिकारी सुटीवरच होता. जसेच राजमाने झोन 3 चे डीसीपी बनले तो अधिकारी कामावर परतला. त्यानंतरही अधिकारी अनेकदा चर्चेत राहिला. मात्र आता संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही अधिकाऱ्यामुळे त्रस्त आहेत. जे पत्र सीपींना लिहिण्यात आले आहे त्यात 2 लाख रुपयांची देणगीचाही उल्लेख करण्यात आला आहे. यातील अर्धी रक्कम अधिकाऱ्याला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा


Sanjay Raut Bail : संजय राऊत यांची आजच सुटका करण्याचे कोर्टाचे आदेश; ईडीची स्थगितीची मागणी फेटाळली