Sanjay Raut Bail : आम्ही लढणारे आहोत... लढत राहू; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. संजय राऊत यांना जमीन मिळाल्यानंतर ठाकरे गटामध्ये नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 09 Nov 2022 07:01 PM
पार्श्वभूमी
Sanjay Raut Bail : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं...More
Sanjay Raut Bail : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे.सुषमा अंधारें यांची प्रतिक्रियापत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'टायगर इज बॅक' अशी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टात काय-काय झालं? मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती देशपांडे यांच्यासमोर पार पडली. मात्र कोर्टाच्या निर्णयावर ईडीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच, या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. हे छोटंमोठं प्रकरण नाही, मोठी नावं यात सहभागी आहेत. त्यामुळे या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली आहे. या आठवड्याचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी आहे. त्यामुळे किमान या आठवड्याभराची स्थगिती द्यावी. जेणेकरून आम्ही या निकालाचा अभ्यासकरून येत्या आठवड्यात हायकोर्टात दाद मागू शकू, असा युक्तिवाद ईडीच्यावतीनं करण्यात आला आहे. दरम्यान, जामीनाबाबत आज दुपारी 3 वाजता न्यायालय निकाल देणार आहे. Sanjay Raut Bail : संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक, त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण गद्दारी केली नाही : आदित्य ठाकरे"संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच पण बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण गद्दारी केली नाही. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं," अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. शिवसेनेचे बुलंद तोफ अशी ओळख असलेले खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.
Sanjay Raut : आलोय बाहेर... आम्ही लढणारे आहोत... लढत राहू; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आलोय बाहेर, आता बघू, आम्ही लढणारे आहोत अशी पहिली प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. न्यायालयाने माझी अटक बेकायदेशीर ठरवली आहे असंही ते म्हणाले.
अमरावतीत दहीहंडी सोहळा, महाप्रसाद घेण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली
अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथे हजारो भाविकांनी दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी दहीहंडी सोहळ्यात उपस्थित लावली. यावेळी दहीहंडीतला महाप्रसाद घेण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली होती. विदर्भाचे पंढरपूर म्हणून नावारूपास असलेले आई रुख्मिणीचे माहेर कौडण्यापूर हे पुरातन काळापासून पासून प्रचलित आहे. तसेच श्रीमत भागवत कथानात पण या कोंडण्यापूरचा उल्लेख आहे, वर्ष भर येथे रुख्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी राहते. पंढरपूरनंतर त्याचे प्रतिरूप असणारे कौडण्यापूरला म्हटले जाते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगाबाहेर आले आहेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून संजय राऊत यांनी त्यांना अभिवादन केलं.
अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथे हजारो भाविकांनी दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावली होती, यावेळी माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी दहीहंडी सोहळ्यात उपस्थित लावली. यावेळी दहीहंडीतला महाप्रसाद घेण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली होती. विदर्भाचे पंढरपूर म्हणून नावारूपास असलेले आई रुख्मिणीचे माहेर कौडण्यापूर हे पुरातन काळापासून पासून प्रचलित आहे. तसेच श्रीमत भागवत कथानात पण या कोंडण्यापूरचा उल्लेख आहे, वर्ष भर येथे रुख्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी राहते पंढरपूर नंतर त्याचे प्रतिरूप असणारे कौंडण्यापूरला म्हटले जाते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊता यांच्या जामीनाला स्थगिती मिळावी, अशा आशयाची ईडीची मागणी मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. यानंतर आता ईडी हायकोर्टात धाव घेतली आहे. संजय राऊत यांच्या जामिनावर आजच हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्याच्या पीएमएलए कोर्टाच्या निर्णयाविरोधात ईडी हायकोर्टात, साडेचार वाजता आपली बाजू मांडणार
ED Moves High Court : पीएमएलए विशेष कोर्टाने खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात ईडी हायकोर्टात पोहोचली आहे. ED साडेचार वाजता या प्रकरणात न्यायमूर्ती भारती डांगले यांच्यासमोर आपली बाजू मांडणार आहे.
आर्थर रोड जेलमधून सुटल्यानंतर संजय राऊत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता
Sanjay Raut Bail : आर्थर रोड जेलमधून सुटका झाल्यानंतर खासदार संजय राऊत थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे स्वतः खासदार संजय राऊत यांचं मातोश्री वर स्वागत करणार आहेत. उद्धव ठाकरे सध्या मातोश्रीवर असून अलिबाग, सिंधुदुर्गमधील जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुखांच्या बैठका घेत आहेत.
Sanjay Raut Bail: 'वेट अँड वॉच': संजय राऊतांचा जामीन मंजूर झाल्यावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
'संजय राऊत यांच्या जामीनबद्दल मी सध्या काय बोलणं घाईच होईल. त्यामुळे लगेच प्रतिक्रिया देणं योग्य नाही मला वाटत ईडी पुन्हा कोर्टात गेली आहे. 3 वाजेपर्यंत निकाल लागणार आहे त्यामुळे वेट अँड वॉच भूमिका आहे.' अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.
Sanjay Raut Bail: 'संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्याचा आनंद झाला आहे. ते लढवय्ये आहेत. राऊत भूमिकेशी ठाम राहणारे नेते आहेत. सावधान रहो, शेअर आ रहा है' अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.
Sanjay Raut Bail: ठाकरे गाटाचे आमदार कैलास पाटील यांनी शेअर केलं ट्वीट
Sanjay Raut Bail: ठाकरे गाटाचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी 'सत्य परेशान हो सकता है.. पराजित नहीं.. जय महाराष्ट्र..' असं लिहिलं आहे.
Sanjay Raut Bail: 'टायगर इज बॅक' शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचं बळ, राऊतांच्या जामीनानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Bail: पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी (Patra Chawl Land Scam) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना अखेर 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushna Andhare) यांनी ट्विट करत न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'टायगर इज बॅक' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut Bail : संजय राऊत यांना आज संध्याकाळीच तुरुंगाबाहेर येणार?
संजय राऊत यांना आज संध्याकाळीच तुरुंगाबाहेर येणार? संजय राऊत तब्बल 100 दिवसांनी जामीन मिळाला आहे. पीएमएलए विशेष कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला असून स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ईडी संजय राऊतांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात अपील करणार आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आज संध्याकाळीच तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut Bail : संजय राऊत यांच्या भांडुपमधील घराबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. दुपारी तीन वाजता शिवसैनिकांकडून संजय राऊतांच्या घराबाहेर जल्लोष साजरा केला जाणार आहे. अशातच संजय राऊत यांच्या मातोश्रींनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "माझा मुलगा येतोय... आनंद आहे...", असं त्या म्हणाल्या आहेत.
Sanjay Raut Bail : संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांचं ट्वीट
Sanjay Raut Bail : संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
Sanjay Raut Bail : संजय राऊतांच्या घरी जल्लोषाची तयारी, दुपारी तीन वाजता निवासस्थानी डीजे लावून जल्लोष
Sanjay Raut Bail : संजय राऊतांच्या घरी जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता संजय राऊत यांच्या निवासस्थानी डीजे लावून जल्लोष करण्यात येणार आहे.