Nagpur Crime News: राज्याच्या उपराजधानीत रुग्णांच्या जीवाशी खेळ चालला आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. त्यामागील कारण म्हणजे नागपुरातील (Crime News) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या मेडिकलमध्येच चक्क बनावट औषधीचा पुरवठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. या संपूर्ण प्रकारानंतर प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. तसेच या बनावट औषधीचे सेवन करणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात बनावट औषधांच्या खरेदी-विक्रीत चार कंपन्यांचे साटेलोटे असल्याचेही उघडकीस आले आहे. दरम्यान, या प्रकरणी बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या चारंही कंपन्यांचे मालक आणि संचालकांविरोधात अजनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच हा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.


खरेदी-विक्रीत चार कंपन्यांचे साटेलोटे उघड


मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी कोल्हापूरमधील विशाल एन्टरप्रायजेसचा संचालक सुरेश दत्तात्रय पाटील, गुजरातमधील सूरत येथील फार्मासिक्स बायोटेकची मालक प्रीती सुमित त्रिवेदी, भिवंडीतील अॅक्वेंटीस बायोटेकचा मालक मिहीर त्रिवेदी, मिरा रोड, ठाणे येथील काबिज जेनेरिक हाऊसचा मालक विजय शैलेंद्र चौधरी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखलय. विशेष म्हणजे, नागपूरच्या ‘एफडीए’ने नुकतेच जिल्हा शल्यचिकित्सक नागपूरच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाच्या औषधी भांडारातील बनावट औषधांचा उलगडा केला होता. त्यावेळी अॅण्टीबायोटिक असलेली ‘रेसीफ-500’ नावाच्या औषधीत ‘सिप्रोफ्लोक्सासिन’ नावाची औषधीच नसल्याचे तपासणीत आढळून आले होते. गुजरात येथील ‘रिफायंड फार्मा’ नावाच्या या कंपनीचे हे औषध असले तरी ही कंपनी अस्तित्वातच नसल्याची बाब चौकशीतून समोर आली होती. यावेळी या प्रकरणात नागपूर कळमेश्वर पोलिसांनी याच महिन्यात सहा जणांना अटक केली होती. 


 कंपन्यांचे मालक आणि संचालकांविरोधात  गुन्हा दाखल


दरम्यान, हे प्रकरण ताजे असताना ‘एफडीए’च्या तपासणीत वैद्याकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या मेडिकलच्या औषधी भांडारात ‘रिक्लॅव्ह 625’ हे औषध बनावट निघाल्याने खळबळ उडाली आहे. अन्न व औषधी प्रशासनाचे औषध निरीक्षक नितीन भांडारकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलीस या प्रकरणाचा आधिक तपास करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या