Gopichand Padalkar on Sharad Pawar: राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्याने चांगलेच डोके वर काढले असून सरकार आणि विरोधकांमध्ये या मुद्यावरून रोज नवे वादंग होत असल्याचे चित्र आहे. अशातच आज आरक्षणाबाबत (Reservation) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येईल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार  घ्यावा, आम्ही त्याबाबाबत पाठींबा देऊ, असेही शरद पवार म्हणाले आहेत. तर दुसरीकडे याच मुद्यावरून परत एकदा भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) शरद पवारांवर प्रखर शब्दात जहरी टीका केली आहे.


शरद पवार यांना गेल्या 80 वर्षानंतर अक्कल यायला लागली आहे   


शरद पवार यांना गेल्या 80 वर्षानंतर अक्कल यायला लागली आहे. आता त्यांची अक्कलदाड यायला सुरूवात झाली आहे. राज्यात तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री होतात. तेव्हा एवढे दिवस तुम्ही का काही केलं नाही? असे म्हणत आमदार गोपीचंद पडखळकरांनी परत एकदा शरद पवारांवर निशाणा साधत त्यांना लक्ष्य केलं आहे. विशेष म्हणजे नुकतेच त्यांनी शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब असल्याचे संगत टीका केली होती. आपल्या आयुष्यात शरद पवार फक्त दोन वेळेस रायगडावर गेले आहेत. नुकतेच शरद पवारांसमोर अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आलीय. त्यामुळे ही घोषणाबाजी करणारे लोकं कोण आहेत? याची चौकशी झाली पाहिजे. सोबतच धनगर समाजाचे वाटोळे हे शरद पवारांनीच केले आहे. असा घाणघातही आमदार गोपीचंद पडळकर  यांनी केला होता. त्यानंतर परत एकदा आमदार पडळकरांनी टीकास्त्र डागले आहे.  


4 वेळा मुख्यमंत्री होता, तेव्हा आरक्षणासाठी तुम्ही का काही नाही केलं?   


आजतागायत हजारो धनगर आणि मराठा समाजाच्या मुलांनी आत्महत्या केली आहे. त्या आत्महत्या झाल्या नसत्या. मात्र, आत्ता 50 टक्क्यांची अट ओलांडा म्हणायचे, पण जेव्हा तुमचे सरकार असताना तुम्ही त्यात का काहीही केलं नाही? परत सत्तेत आले की म्हणणार आरक्षणच विषय हा केंद्राच्या हातात आहे. त्यामुळे आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, असे म्हणणाऱ्या शरद पवार यांना गेल्या 80 वर्षानंतर आता अक्कल यायला लागली असल्याची जहरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. तसेच जत विधानसभा मतदारसंघातून मी लढावं, अस जनतेच म्हणणं असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 


हे ही वाचा 


Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या