Chandrapur News चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोरपणा येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात (Chandrapur Crime) मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील संबंधित शाळेच्या संचालकावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शाळेचे संचालक हे आरोपीचे चुलत काका असून शाळेच्या संचालक मंडळात देखील ते सामील असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता पॉक्सो कायद्याच्या (POCSO) कलम 21 अंतर्गत शाळेच्या संचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 


तर हे प्रकरण माहीत असून देखील याबाबत पोलिसांत तक्रार केली नसल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे कोरपना येथे झालेल्या या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणामुळे स्थानिक लोकं अतिशय संतप्त झाले आहे. देशभरात नवरात्र उत्साव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना राज्यात महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने त्याचे पडसाद आता सर्वच स्थरातून उमटत आहे. परिणामी आता या प्रकरणात पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे.  


पीडित मुलीला शाळेत बोलावून तिच्यावर अत्याचार


महिनाभरपूर्वी बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला असताना, राज्यातील विविध जिल्ह्यातून आणखी अशा घटना पुढे येत आहेत. दरम्यान, आता, चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोरपना येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरण उजेडात आले आहे. यात उन्हाळ्यात ज्युनिअर IAS class घेण्याच्या बहाण्याने आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला शाळेत बोलावून तिच्यावर अत्याचार केला आहे. सोबतच तुझ्या आई-वडिलांना जीवानिशी मारून टाकेन, अशी धमकी देत आरोपीने पीडित मुलीला धमकावले आहे. मात्र, पीडित मुलीने मैत्रिणीकडे या प्रकरणाची वाच्यता केल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी, पोलिसांनी आता pocso कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत संबंधित आरोपीला अटक केली आहे. तसेच आता संबंधित शाळेच्या संचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बलात्कारांच्या घटनेचा सर्वच स्थरातून निषेध  


दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला अकोल्यातुन अटक करण्यात आली आहे. आरोपी हा युवक काँग्रेसचा (Congress) कोरपना शहर अध्यक्ष आहे. कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक असलेल्या आरोपीने 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, या घटनेचे राजकीय पडसादही उमटताना दिसून येत आहेत. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा केली जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर यावर बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील पक्ष न पाहता कारवाई केली जावी असे सुतोवाच केले आहे. त्यामुळे एकीकडे राजकीय वादंग उठले असताना या प्रकरणामुळे स्थानिक लोकंही अतिशय संतप्त झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाचे चक्र अधिक गतिमान करत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. 


हे ही वाचा