एक्स्प्लोर
नागपूरमधील जुळ्या भावांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर अटकेत
नागपूर : नागपूरमधील हायटेन्शन वायरच्या शॉकमुळे झालेल्या जुळ्या भावंडांच्या मृत्यूप्रकरणी पहिली कारवाई करण्यात आली आहे. जुळ्या भावंडांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर आनंद खोब्रागडेला अटक करण्यात आली आहे.
नागपुरातल्या सुगतनगर भागात 31 मे रोजी आरमोर्स टाऊनशिपमध्ये हायटेन्शनच्या वायरचा शॉक लागून पियुष धर आणि प्रियांश धर या भावंडांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर हायटेन्शनच्या वायरखाली गृहप्रकल्पाला मंजुरी मिळालीच कशी असा सवाल उपस्थित झाला.
एबीपी माझाने या प्रश्नी आवाज उठवला आणि अखेर पोलिसांनी या इमारतीचा बिल्डरला बेड्या ठोकल्या आहेत. पण या इमारतीला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement