एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
शेतकरी आत्महत्येचा देखावा करताना कलाकाराला गळफास
एका ट्रॅक्टरवर शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करण्यात आला होता. 27 वर्षीय मनोज धुर्वे हा कलाकार गळ्यात दोर बांधून देखावा सादर करत होता.
![शेतकरी आत्महत्येचा देखावा करताना कलाकाराला गळफास Nagpur : Artist dies while playing act on Farmer suicide latest update शेतकरी आत्महत्येचा देखावा करताना कलाकाराला गळफास](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/03195314/Nagpur-Farmer-Suicide-act-Manoj.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : शेतकरी आत्महत्येचा देखावा करणं नागपुरातील कलाकाराच्या जीवावर बेतलं. शोभायात्रेत गळफास घेतल्याचा देखावा सादर करताना खरोखरच फास बसून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
गुरुवारी रात्री वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये एका ट्रॅक्टरवर शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करण्यात आला होता. 27 वर्षीय मनोज धुर्वे हा कलाकार गळ्यात दोर बांधून देखावा सादर करत होता.
शोभायात्रा गांधी चौक ओलांडून पुढे जात असताना चालत्या ट्रॅक्टरमध्येच मनोजला गळफास बसला आणि तो खाली कोसळला. नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं, मात्र रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion