Nagpur Accident नागपूर: नागपुरात परत एकदा भरधाव ऑडी कारचा थरार अनुभवायला मिळाला आहे. नागपुरात काल, रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने धावणाऱ्या एका ऑडी कार ने दोन अन्य कार आणि एका दुचाकीला धडक (Nagpur Accident) दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या अपघातात दोन्ही कार आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कार मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन (Nagpur Police) अंतर्गत मध्यरात्री साडे बारा वाजताच्या सुमारास काचीपुरा चौक ते रामदास पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोषींवर कायदेशीर कारवाई केली आहे. तर अपघात घडवणारी ऑडी कार ही भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या कुटुंबाशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या तरी पोलीस यासंदर्भात काहीही बोलायला तयार नाहीत. मात्र या घटनेने परत एकदा भरधाव ऑडी कारचा थरार अनुभवायला मिळाला आहे. 


ऑडी कार भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबाशी संबंधित?


मिळालेल्या माहितीनुसार,  पोलिसांनी याप्रकरणी कार चालवणारा चालक अर्जुन हावरे आणि त्याच्या शेजारी बसलेल्या रोनित चिंतमवार या दोघांच्या विरोधात रैश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे. तर हे दोघे मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असताना हा अपघात झाल्याचं पोलिसांचा अंदाज असून पोलिसांनी अर्जुन हावरे आणि रोहित चिंतमवार या दोघांचे रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवले आहे. दरम्यान, अपघात घडवणारी ऑडी कार भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबाशी संबंधित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात आणि रक्त चाचणीत नेमका काय रिपोर्ट येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र सध्या तरी पोलीस यासंदर्भात अधिक बोलायला तयार नाहीत.


हे ही वाचा