एक्स्प्लोर

नागपुरात 22 वर्षीय तरुणाचा खून, दहा दिवसातील सातवी हत्या!

गेल्या दहा दिवसात शहरात आणि अवतीभवतीच्या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र आहे.

नागपूर : नागपूरकरांची आजची सकाळ पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने झाली. गोंडखैरीमध्ये आज एका 22 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यारांनी भोसकून हत्या करण्यात आली. नंदू भोसले असं मृत तरुणाचं नाव असून गोंडखैरी इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील स्वच्छतागृहात त्याला फेकलं होतं. पूर्व वैमनस्यातून ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या दहा दिवसात शहरात आणि अवतीभवतीच्या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. या दहा दिवसात नागपुरात एकामागोमाग एक सात जणांची हत्या झाली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. हत्यांचा घटनाक्रम पहिली हत्या : 26 एप्रिल 2018 - नंदनवन परिसरातील पँथरनगर मध्ये तडीपार गुंड राहुल पावस्करची भोसकून हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधांच्या संशयातून प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी राहुलची हत्या केली होती. (आरोपीला अटक) दुसरी हत्या : 27 एप्रिल 2018 - अजनी परिसरातील रामटेके नगरात अविनाश माहुर्लेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. (आरोपीला अटक) तिसरी हत्या : 30 एप्रिल 2018 - नंदनवन परिसरात गुरुदेवनगरमधील पंचशील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून 13 लाखांची लूट करत दरोडेखोरांनी नूर खान या सुरक्षा रक्षकाची हत्या केली. लुटारुंना पेट्रोल पंपावर साठवलेली रक्कम लुटायची होती. त्यात अडसर ठरलेल्या नूर खानची हत्या करत ती लूट करण्यात आली. हे घटनास्थळ दाट लोक वस्तीत अत्यंत वर्दळीच्या भागात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं होतं (आरोपीला अटक) चौथी हत्या : 1 मे 2018 - गोधनी परिसरात गजानन नगरात महिमा विटोले या 20 वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून रस्त्यावर गळा चिरुन हत्या करण्यात आली. आरोपी महिमाला तिच्यासोबत राहण्याचे सतत आग्रह करायचा. पण महिमा त्याला टाळत होती. (आरोपीने स्वतः पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती) पाचवी हत्या : 3 मे 2018 - रामनगरमध्ये कर्नाटक संघासमोर रज्जू यादव या 33 वर्षीय इसमाची फेरीवाला आणि त्याच्या सहकाऱ्याने पैशाच्या वादातून डोक्यावर सत्तूरने वार करत भरदिवसा हत्या. (दोन्ही आरोपींना अटक) सहावी हत्या : 7 मे 2018 - एमआयडीसी परिसरातील आयसी चौकात श्रीकांत गुहे या 22 वर्षीय गुन्हेगाराची टोळी युद्धातून हत्या. मृत एक महिन्यापूर्वीच जेलमधून सुटला होता. विरोधी टोळीने जुन्या गुन्ह्याचा सूड घेण्यासाठी हत्या केली. सातवी हत्या : 5 मे 2018 - गोंडखैरी गावात जिल्हा परिषद शाळेत नंदू भोसले या 22 वर्षीय तरुणाची अज्ञात मारेकरीकडून तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या. पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget