नागपूर : नागपुरात आज होणाऱ्या मराठा मूक मोर्चात सर्वपक्षीय आमदार सहभागी होणार आहेत. पक्ष शिष्टाचार डावलून प्रामुख्याने मराठा आणि कुणबी आमदार या मोर्चात सहभागी होण्यासाठी एकवटले आहेत.

दोन्ही सभागृहाच्या एकूण 169 मराठा आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर हा मोर्चा धडकणार असल्याने, मोर्चात पहिल्यांदाच सर्वपक्षीय आमदारांची सर्वाधिक संख्या दिसणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या उत्स्फूर्त निघणाऱ्या मोर्चांला आमदार हायजॅक करतात का असा प्रश्न निर्माण उपस्थित होत आहे.

विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षांमध्ये या मोर्चाचं श्रेय घेण्याची चढाओढ बघायला मिळत आहे. भाजपचे मंत्री अणि आमदार या मोर्चा सर्व शक्ती पणाला लावत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या सर्व आमदारांना भगवे फेटे परिधान करुन या मोर्चात सहभागी होण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत

विधानसभा - 288 आमदार

विधानपरिषद - 78 आमदार

दोन्ही सभागृहात एकूण - 366 आमदार

दोन्ही सभागृहातील मराठा आणि कुणबी आमदारांची संख्या - 169

पक्षनिहाय मराठा आणि कुणबी आमदार :

भाजप - 53

शिवसेना - 44

काँग्रेस - 29

एनसीपी - 43

नागपुरात होणाऱ्या मराठा मोर्चात विधिमंडळातील 47 टक्के आमदार सहभागी होण्याची शक्यता आहे.

विधानभवनातील मराठा आणि कुणबी आमदारांची यादी