अहमदनगर : सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असणाऱ्या अहमदनगर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी राबवलेल्या ऑल आऊट मोहिमेअंतर्गत गेल्या एका महिन्यात वॉरंटमधील 1900 आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत, तर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.


पोलिसांनी केलेली कारवाई

वॉरंटमधील एक हजार 900 आरोपी जेरबंद

387 पाहिजे असलेले फरारी आरोपी अटकेत

74 आर्म्स अॅक्टनुसार केसेस दाखल

16 पिस्टल आणि 23 जिवंत राऊंड जप्त

34 तलवारी आणि 36 चाकू जप्त

प्रोव्हेशन अॅक्टनुसार 311 केसेस दाखल

69 केसेस जुगार अड्ड्यांवर

साडेतीन हजार समन्स आणि 15 दरोड्याच्या टोळ्या जेरबंद

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. केडगावला शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड झालं, त्यानंतर जामखेडला राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी याची दखल घेऊन गुन्हेगारीला लगाम लावण्याची सूचना केली होती. त्यानंतर पोलिसांनी आक्रमक होत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली.