धाराशिव : महसूल विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि जबाबदार कर्मचारी म्हणून गाव तलाठ्यांकडे (Talathi) पाहिले जाते. तलाठ्यांना गावातील नागरिकांच्या समस्यांचे निकारण करण्यासाठी तलाठी व पंचायत कार्यालयात ठेवण्यात आलेले असते. त्यामुळे, गावच्या जमिनीच्या नोंदी, शेतकऱ्यांशी संबंधित महत्वाच्या विषयावर गाव तलाठ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहते. मात्र, अनेकदा तलाठ्यांबद्दल तक्रारच अधिक येत असल्याचं दिसून येतं. तर, तलाठी म्हणजे लाच घेतल्याशिवाय कामच करत नाहीत, असाही समज जनमाणसांत आहे. त्यामुळे, तलाठी पदाची सोशल मीडियावरही नेहमीच खिल्ली उडवली जाते. आता, धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील अशाच एका तलाठ्याचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ आता समोर आला आहे.    

Continues below advertisement

धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तहसील कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत हे तलाठी महाशय पोहोचले होते. तलाठी महोदयांचा हा अवतार पाहून सरकारी कार्यालयात चांगलीच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे कायम वर्दळ असलेल्या परंडा तहसिल कार्यालयातील जाण्या-येण्याच्या ठिकाणीच नशेमध्ये धुंद झालेला तलाठी कार्यलीयन परिसरातच झोपल्याचं दिसून आलं. त्यामुळे, तहसिल प्रशासनातील अनेक कर्मचारी व नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते. बघ्यांची गर्दी तलाठ्याला पाहण्यासाठी जमल्यानंतर आता या मद्यधुंद महाशयांचं करायचं काय, असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला. तेव्हा, तहसील प्रशासनाने रुग्णवाहिकेला पाचारण करुन रुग्णावाहिकेतून सबंधित तलाठ्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

गुणाजी ढोणे असं मद्यधुंद अवस्थेतील तलाठ्याच नाव असून परंडा तहसिल कार्यालयात ते अनेक वर्षांपासून कर्मचारी आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ढोणे तलाठी कोणतीही सूचना न देता होते गैरहजर राहिले होते. त्यांच्या या गैरहजरी वर्तनाबद्दल तहसिलदारांनी त्यांना नोटीसही बजावली होती. पण, तलाठ्याने नोटीसीला कुठलेही उत्तर दिले नाही. तहसिलदारांच्या नोटीशीला उत्तर न दिल्याने संबधित तलाठ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. दरम्यान, या तलाठ्यांनी अगोदरही दारु पिऊन कार्यालयात येण्याचा प्रकार केल्याने त्यांना समजही देण्यात आली होती. मात्र, आजचा प्रकार तहसिल प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

''काहीही करा जमीन विकू नका''; शरद पवारांचा गावकऱ्यांना मोलाचा सल्ला, मोदींसह अजित दादांवर शाब्दीक हल्ला

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2024 | गुरुवार