रायगड : मुरुड दुर्घटनेप्रकरणी सुमारे अडीच महिन्यांनी गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील आझम कॅम्पसच्या संस्थाचालक आणि शिक्षकांवर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

मुरुडच्या समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या पुण्यातील कॉलेजच्या 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता.  संस्थाचालक आणि शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

पुण्यातील आझम कॅम्पस संस्थेच्या आबेदा इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थी 1 फेब्रुवारी रोजी मुरूडला सहलीसाठी गेले होते. त्यापैकी काही जण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र, समुद्रात उतरलेल्या या विद्यार्थ्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच 14 विद्यार्थ्यांचा बुडून मत्यू झाला होता. तब्बल अडीच महिन्यानंतर कलम ३०४अ, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने पुढील कारवाई होणार आहे.