मुंबई : महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना दिलासा दिला आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी अक्षयने 50 लाखांची मदत केली आहे.


 
अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार योजनेसाठी मदत करत असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भातलं ट्विट केलं होतं.

 
अक्षय कुमारने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी तब्बल 90 लाखांची मदत जाहीर केली होती. यानुसार तो महिन्याला 15 लाख अशी रक्कम सहा महिने देणार आहे.

 
अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करण्यास सुरुवात केल्यानंतर बळीराजाला मदत करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता आमीर खान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत केली होती.