एक्स्प्लोर

पुणे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे असं पालकमंत्री म्हणतात, पण त्यांचे उमेदवार पाहिले तर...मुरलीधर मोहोळांचा अजित पवारांना टोला 

गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरुन केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol ) यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) टिका केली आहे.

Murlidhar Mohol on Ajit Pawar Pune : गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरुन केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol ) यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) टिका केली आहे. भाजपने हत्येचे अनेक आरोप असलेल्या रोहिदास चोरघेच्या पत्नीला प्रतिभा चोरघेला उमेदवारी का दिली? असा सवाल मुरलीधर मोहोळ यांना विचारला असता त्यांनी अजित पवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या उमेदवारांकडे बोट दाखवलं आहे. पालकमंत्री एकीकडे पुणे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे असं म्हणतात आणि दुसरीकडे शहराच्या पुर्वेपासुन पश्चिमेपर्यंत त्यांचे उमेदवार पाहिले तर ते कोणत्या तत्वात बसतं असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी टीका केली.

भाजपने प्रभाग क्रमांक 38 मधुन हत्येचे , गोळीबार आणि अपहरणाचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या रोहिदास चोरघेच्या पत्नी प्रतिभा चोरलेला उमेदवारी दिली आहे. त्याबद्दल विचारलं असता मोहोळ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर आणि बापू नायर या गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या असलेल्या उमेदवारांच्या उमेदवारीवर बोट ठेवलं आहे. गुन्हेगारांना उमेदवारी न देण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना युती तुटली

राज्यात भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीचे सरकार आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना याची युती होणार असे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केेले होते. शिंदेसेनेने भाजपकडे 35 जागेची मागणी केली होती. पण, प्रत्यक्षात 15 जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली. पण, सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे शिंदेसेेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 125 जागांवर शिंदेसेनेने उमेदवार दिले. युतीमध्ये कमी जागा वाट्याला आल्यामुळे शिंदेसेनेच्या निवडून येणाऱ्यांची संख्या कमी राहिली असती. आता स्वबळावर लढत असल्यामुळे युतीपेक्षा जास्त जागा शिंदेसेनेच्या निवडून येतील असा दावा शिवसैनिक करत आहेत. प्रत्यक्षात निवडणुकीच्या निकालानंतरच हे कळणार आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या गुप्त बैठका आणि गाठीभेटींनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यातही एकत्रच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आधी जागावाटपामुळे आणि काही कारणामुळे प्रस्तावीत युती फिस्कटल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती शिक्कामोर्तब झाले आहे. पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात 40 जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी लढणार आहे. तर पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंची सेना स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस आणि उद्धवसेना एकत्र लढणार आहेत. उद्धवसेनेचे आणि मनसेची युती झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलेल्या जागेतून मनसेला काही जागा देण्यात येणार आहे. भाजप आणि शिेंदेची युती न झाल्याने पुण्यात चौरंगी लढत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget