एक्स्प्लोर

32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप

हत्या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. पण त्यावेळी सांगली पोलीस दलात कार्यरत असलेली लुसी श्वान ही या घटनेत महत्त्वाची साक्षीदार ठरली. इतकंच नाही, तर तिच्यामुळे हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे.

सांगली : अनेक प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने किंवा महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाल्याने आरोपीची निर्दोष सुटका झाल्याचं आपण पाहतो. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील एका हत्या प्रकरणातही असेच महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. पण त्यावेळी सांगली पोलीस दलात कार्यरत असलेली लुसी श्वान ही या घटनेत महत्त्वाची साक्षीदार ठरली. इतकंच नाही, तर तिच्यामुळे हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप वाळवा तालुक्यातील वाटेगावमध्ये येथे उसनवार दिलेल्या पैशाच्या वादातून मे 2015 मध्ये एक हत्या झाली. सागर विलास नलवडे (वय 28, रा. वाटेगाव) असं हत्या झालेल्या युवकाचं नाव होतं. सागरने आरोपी शंकर सावंत याच्याकडून 10 हजार रुपये घेतले होते. सावंत हा या पैशाची वारंवार मागणी करत होता. मात्र सागर पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. हा राग मनात धरून आरोपी शंकर सावंत याने त्याला मद्यपान करण्याचा बहाणा करत बरोबर नेलं आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सागरच्या पोटावर, तोंडावर आणि कपाळावर वार झाल्याने रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर विलास तातोबा नलवडे याने कासेगाव पोलिसात फिर्याद दिली. सरकारी पक्षातर्फे 32 साक्षीदार तपासण्यात आले. या हत्या प्रकरणात कुणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नव्हता. तसेच जे महत्त्वाचे साक्षीदार होते ते फितूर झाले. 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप यामध्ये त्यावेळी सांगली पोलीस दलात कार्यरत असलेली लुसी श्वान ही महत्त्वाची साक्षीदार ठरली. पोलीस दलातील लुसीने आपले चालक हवालदार अनिल रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शंकर सावंत याची घटनास्थळावरच ओळख पटवली होती. लुसीला मृताच्या अंगावरील कपडे आणि रक्ताने अर्धवट माखलेल्या चाकूच्या मुठीचा वास देण्यात आल्यावर लुसीने शंकर सावंत याला ओळखलं. केवळ लुसीच्या या कामगिरीने सावंत याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली. लुसी आज हयात नाही. पोलीस दलात 10 वर्ष सेवा बजावल्यानंतर 2 जानेवारी 2017 रोजी लुसी सेवानिवृत्त झाली. 8 डिसेंबर 2017 रोजी वृद्धापकाळाने लुसीचा मृत्यू झाला. मात्र 2015 साली लुसीने केलेल्या कामगिरीने आणि त्या कामगिरीला आज आलेल्या यशाने लुसीची पोलीस दलाला पुन्हा एकदा आठवण झाली आहे. 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget