मुंबई : येत्या काही दिवसांसाठी बाजारातील औषधांचा साठा घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांनी आपल्या गरजेपुरता औषधांचा अतिरिक्त साठा ठेवावा, असं आवाहन केमिस्ट असोसिएशनकडून करण्यात आलं आहे.


केमिस्टच्या दुकानात एक-दोन महिन्यांचा औषधांचा स्टॉक केलेला असतो. मात्र एक जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीचा सर्वाधिक फटका केमिस्ट रिटेलर्सना बसणार आहे. एक तारखेपासून या औषधांवर 6 ऐवजी 12 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.

अतिरिक्त टॅक्स भरुन जुन्याच किंमतीत औषधं विकावी लागणार असल्यानं केमिस्ट रिटेलर्सनी नवीन औषधांचा स्टॉक घेणं बंद केलं आहे. परिणामी पुढचे काही दिवस औषधांचा तुटवडा जाणवेल. मात्र 1 जुलैपासून नवीन माल आल्यावर ही औषधं स्वस्त होतील असंही स्पष्ट करण्यात येत आहे.