नागपूर : नागपुरात गुंडगिरीमुळे एका उमद्या अभियंत्याला जीव गमवावा लागला आहे. गोळीबार चौकात ओम शक्ती सावजी हॉटेल समोर झालेल्या पार्किंगच्या किरकोळ वादामुळे हा प्रकार घडला.

नागपूरच्या एका नामांकित कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या आशिष कांबळेचा क्षुल्लक कारणावरुन झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला.

रविवारी संध्याकाळी आशिष एका क्लायंटला घेऊन गोळीबार चौकातील हॉटेलमध्ये जेवायला आला. रस्त्याच्या कडेला त्यानं आपली झायलो पार्क केली. मात्र अॅक्टिव्हावरुन आलेल्या अतुल सदावर्दे आणि स्वप्नील महाजन या दोघांनी पार्किंगवरून आशिषला हटकलं.

वर्मी घाव लागल्यामुळे आशिष कोसळला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेसाठी स्थानिकांनी गोळीबार चौकात उशिरा रात्रीपर्यंत सुरु असणाऱ्या हॉटेल्स आणि बारना जबाबदार धरलं आहे.

आशिष कांबळेच्या मृत्यूमुळं त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र क्षुल्लक कारणावरुन नागपूरकरांचा संयम का ढसळू लागला आहे, असा प्रश्न या घटनेनं उपस्थित केला आहे. याचं उत्तर पोलीस यंत्रणेबरोबर स्वतः नागपूरकरांनाही शोधावं लागणार आहे.