मुंबई : गुणवत्ता आणि विषय आकलनात मुंबईचे विद्यार्थी नापास झाल्याचं नॅशनल अॅचिव्हमेंट सर्व्हे (NAS) 2017-18 मधून समोर आलं आहे. NAS च्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सर्वेक्षणात मुंबईचा नंबर सर्वात शेवटी आहे.
NAS अंतर्गत शासकिय, अनुदानित शाळांमधील तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सर्व्हे करण्यात आला होता. यात संपूर्ण देशातील एक लाख दहा हजार शाळांचा समावेश होता.
गणित, भाषा, विज्ञान, समाजशास्त्र अशा विषयांवर तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले गेले. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय चाचणीत मुंबईची कामगिरी मात्र सुमार आहे. या चाचणीत मुंबईचा क्रमांक शेवटीच आहे.
तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता चाचणीत मुंबईचा क्रमांक सर्वात शेवटी आहे. मुंबईतल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी पाहता मुंबईचा क्रमांक शेवटून सातवा आहे आणि आठवीतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीबाबत मुंबईचा क्रमांक राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटून दुसरा आहे.
दरम्यान, ही परिस्थिती सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेकडून सराव चाचण्यांचं आयोजन केलं जात असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, सर्व विषयांच्या सराव चाचण्या एकाच दिवशी ठेवल्याने विद्यार्थ्यांवर अतिरीक्त भार येतोय.
या सराव चाचण्यांचं नियोजन ढिसाळ असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याऐवजी अधिकच ढासळेल असा पालकांचा आणि शिक्षण समितीचा आरोप आहे.
सर्वाधिक गुण मिळवलेले टॉप 10 जिल्हे
गुणवत्ता आणि आकलनात मुंबईच्या विद्यार्थ्यांचा शेवटून पहिला क्रमांक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2018 08:55 PM (IST)
NAS च्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सर्वेक्षणात मुंबईचा नंबर सर्वात शेवटी आहे. NAS अंतर्गत शासकिय, अनुदानित शाळांमधील तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सर्व्हे करण्यात आला.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -