एक्स्प्लोर

सलग सुट्ट्यांमुळे नागरिक शहराबाहेर, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

सलग सुट्ट्यांमुळे नागरिक शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे राज्यात महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येतंय. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागतोय.

मुंबई: नाताळासोबत जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक लोक घराबाहेर पडल्याचं पहायला मिळतंय. हजारोंच्या संख्येने शहरातील पर्यटक राज्यातल्या विविध पर्यटन स्थळांकडे रवाना होत आहेत. याचा परिणाम राज्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होण्यात झाला आहे.

सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी सिंहगडावर जाण्यासाठी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झालीय. सिंहगडावर गेलेली वाहन जोपर्यंत खाली परत येत नाहीत तोपर्यंत खालच्या वाहनांना वर न पाठवण्याचा निर्णय पोलीस आणि वन विभागाने घेतला आहे. सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध कोंढणपूर फाट्याजवळ वाहनांना थांबवण्यात आलंय. त्यामुळे सिंहगडावर जाण्यासाठी निघालले पर्यटक कित्येक तास या वाहतूक कोंडीत अडकून पडलेत. सिंहगडावर जाणारा रस्ता अरूंद असल्यानं अनेक ठिकाणी वाहनं समोरसमोर आल्याने वाहतूक कोंडी झालीय.

अलिबागजवळ वाहनांची मोठी रांग सलग सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणांनाही प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे अलिबागजवळ वाहनांची मोठी रांग लागली आहे. मुंबई आणि पुण्याहून अलिबाग आणि मुरूडकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागल्याने या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अलिबाग शहर ते कार्लेखिंड दरम्यान दुपारपर्यंत वाहनांच्या सुमारे 4 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्ग या काळात शहरातील नागरिक आपल्या गावी जात आहेत तसेच निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत. सलग सुट्ट्यांमुळे मुंबईतील नागरिक मोठ्या प्रमाणावर शहराबाहेर पडताना दिसत आहेत. याचाच परिणाम म्हणून सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर खालापूरनजीक वाहनांची चार ते पाच किमीची भली मोठी रांग लागली होती. खालापूर टोल नाक्याजवळ आणि पुढे बोरघाटातही वाहतूक कोंडी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाश्यांना अनेक तासांपासून या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.. खालापूर टोलजवळ वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत तर, बोरघाटात अमृतांजन ब्रिजवर मुंबईच्या दिशेला वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

शेगाव येथे भाविकांची गर्दी आज सलग दुसऱ्या दिवशी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात भाविकाँची गर्दी वाढली आहे. .अनेक भक्त कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाहीये. त्यामुळे शेगाव प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने अचानक बिना मास्क फिरणाऱ्या भाविकांवर कारवाई सुरु केली आहे. शेगाव येथे भाविकांची गर्दी वाढली असून उद्याही यापेक्षा जास्त गर्दी होणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेगाव येथे येताना भाविकानी कोरोना नियम पाळावेत असं अवाहन स्थानिक प्रशासनानं केलं आहे

पहा व्हिडिओ: Khalapur Toll Naka | मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget