एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक सुरु

(फाईल फोटो)
पुणे: मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील पहिला ब्लॉक संपला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली आहे. आता दुसरा ब्लॉक दोन वाजता घेण्यात येईल. दरम्यान, आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक रोखण्यात आली होती. पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आडोशी बोगद्याजवळ दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती. सध्या ठिसूळ झालेली दरड काढण्याचं काम सुरु आहे. यासाठी दोन्ही बाजूकडील वाहतूक दुपारी सव्वा बारापासून थांबवण्यात आली होती. महामार्गावरील वाहतूक टप्याटयाने बंद करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही अशाचपद्धतीने दरड हटवण्यासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती.
Before You Go
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















