एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
मुंबई वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराची धडक, कॉन्स्टेबल जखमी
![मुंबई वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराची धडक, कॉन्स्टेबल जखमी Mumbai Police Constable Hit By Bikerider मुंबई वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराची धडक, कॉन्स्टेबल जखमी](https://static.abplive.com/abp_images/539849/photo/Mumbai_Map.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या निधनाला चोवीस तास होत नाहीत, तोच पुन्हा एकदा मुंबई वाहतूक पोलिसावर दुर्दैवी वेळ ओढावल्याचं वृत्त आहे. कर्तव्य बजावत असताना एका वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराने धडक दिली आहे.
मुंबईतील कुर्ला परिसरात बैलबाजार पोलीस चौकीजवळ पोलिस कॉन्स्टेबल देवीदास निंबाळकर दुपारी 1.50 वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी करत होते. त्यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला थांबण्याचा इशारा त्यांनी केला. मात्र दुचाकीचालक इम्तियाज खान यानं त्यांना चकवण्याचा प्रयत्न केला.
त्याचवेळी इम्तियाजने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करणारे पोलीस हवालदार निंबाळकर यांना धडक दिली. यात देवीदास निंबाळकर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी पाठलाग करुन आरोपी इम्तियाज खानला ताब्यात घेतलं आहे.
संबंधित बातमी :
मारहाणीत जखमी झालेले पोलीस शिपाई विलास शिंदेंचं निधन
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)