Mumbai Metro 2A and 7: गुंदवलीहून अंधेरी आणि दहिसर पूर्वेकडून गुंदवलीसाठी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महामुंबई मेट्रोच्या 'मेट्रो 2 A' आणि 'मेट्रो 7' वरील मेट्रो सेवांच्या रात्रीच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या मेट्रो लाईनवरून शेवटची मेट्रो रात्री 10.09 ऐवजी 10.30 वाजता सुटणार आहे. मेट्रो लाइन 2A आणि 7 येथे रात्री 10 वाजून 9 मिनिटांनी सुटणाऱ्या शेवटच्या ट्रेनची वेळ रात्री 10.30 पर्यंत वाढवण्यासाठी दोन्ही मार्गांवर दोन अतिरिक्त सेवा सुरू केल्या जाणार आहे. ही अतिरिक्त मेट्रो सेवा 14 फेब्रुवारीपासून प्रारंभी दोन महिन्यांसाठी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महामुंबई मेट्रोने माहिती दिली आहे.


Mumbai Metro 2A and 7: रात्री या वेळेवर धावणार मेट्रो: 


1. अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व 22.20 आणि 22.30 वाजता. (दोन सेवा)


2. गुंदवली ते डहाणूकरवाडी मार्गे दहिसर पूर्व 22.20 आणि 22.30 वाजता. (दोन सेवा)


फेज-2 कार्यान्वित झाल्यानंतर सेवांची संख्या आणि प्रकल्प लाईनच्या पूर्ण लांबीपर्यंत वाढ झाली आहे.


Mumbai Metro 2A and 7: विविध गंतव्यस्थानांसाठी शेवटच्या गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:


• गुंदवलीहून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची ट्रेन – 21:30 वा.


• गुंदवलीहून डहाणूकरवाडीसाठी शेवटची ट्रेन – 22:30 वा.


• गुंदवलीसाठी अंधेरी पश्चिमेकडून शेवटची ट्रेन – 21:30 वा.


• अंधेरी पश्चिमेकडून दहिसर पूर्वेसाठी शेवटची ट्रेन – 22:30 वा.


• दहिसर पूर्वेकडून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची ट्रेन – 22:03 वा.


• दहिसर पूर्वेकडून गुंदवलीसाठी शेवटची ट्रेन – 22:08 वा.


• डहाणूकरवाडीसाठी दहिसर पूर्वेकडून शेवटची ट्रेन – 23:11 वा.


"एमएमएमओसीएलने प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो सेवांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आमच्याकडे 28 मेट्रो रेक आहेत जे दोन्ही लाईन चालवण्यासाठी पुरेसे आहेत. आम्ही या अतिरिक्त सेवांना प्रवाशांचा प्रतिसाद पाहणार आहोत आणि आवश्यक असल्यास आम्ही सेवा वाढवण्याबाबत विचार करू," असं एमएमआरडीएचे आयुक्त आणि MMMOCL चे अध्यक्ष,  S.V.R. श्रीनिवास यांनी सांगितले.


दरम्यान, 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील मेट्रो दोन अ आणि मेट्रो 7 या दोन्ही मार्गिकाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले होते.  या मार्गिका सुरू झाल्याने पश्चिम उपनगरात पूर्व आणि पश्चिमेला मेट्रो मार्गिका उपलब्ध झाल्या आहेत. तसेच या दोन्ही मार्गिका मेट्रो वन सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बस आणि लोकलमधून होत असलेला अतिशय त्रासदायक आणि क्लेशदायक प्रवासापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मेट्रोचे कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 60 रुपये असे तिकिटांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.