मुंबई : मुंबईत राहणाऱ्या YouTuber ला त्याच्या घराच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवणे महागात पडलं आहे. वांद्रेत राहणाऱ्या युट्युबरच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरा हॅक केल्यानंतर युट्युबरची आई व बहिणीचा नग्न व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका यूट्यूबरने मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वांद्रे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. अतिशय धक्कादायक तक्रारीत, 21 वर्षीय युट्युबरने सांगितले की, सुरक्षेच्या उद्देशाने त्याच्या घरात बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा बाहेरच्या व्यक्तीने हॅक केला होता. त्यानं म्हटलं आहे की, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला आई आणि बहिणीचा न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या खळबळजनक प्रकरणाचा तपास वांद्रे पोलीस करत आहेत.
युट्युबरने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत काय म्हटले आहे?
मुंबई पोलिसांच्या सूत्राने सांगितले की, पोलिसांना दिलेल्या तक्रारीत यूट्यूबरने सांगितले की त्याच्या एका मित्राने त्याला फोन केला आणि सांगितले की त्याच्या आई आणि बहिणीचा खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या माहितीच्या आधारे पीडिताला समजले की, अज्ञात व्यक्तीने त्याच्या घरातील सीसीटीव्ही अॅक्सेस केला. हा व्हिडिओ 17 नोव्हेंबरचा आहे, जेव्हा तिची आई आणि बहीण वेगवेगळ्या वेळी कपड्यांशिवाय बाथरूममधून बाहेर पडल्या आणि तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हा वैयक्तिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल केला?
YouTuber च्या तक्रारीवरून, वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 500, 501 आणि आयटीच्या कलम 66(C), 66(E), 67(A) नुसार गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. वांद्रे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची चौकशी केली जात आहे. तपास पथकाने सीसीटीव्ही यंत्रणा हॅक करण्यासाठी वापरलेला आयपी पत्ता शोधून काढला आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की त्यांनी त्या सर्व सोशल मीडिया साइट्सना तो व्हिडिओ हटवण्याची विनंती केली आहे.
महिलेचा बाथरुममध्ये व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न
दुसरीकडे, एक आठवड्यापूर्वी मुंबईमध्येच शताब्दी रुग्णालयातील (Shatabdi Hospital) धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने बाथरुममध्ये महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या प्रकरणात गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गुप्ता असं अटक केलेल्या आरोपीच नाव आहे. तो शताब्दी रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करत होता.
इतर महत्वाच्या बातम्या