एक्स्प्लोर

खडसेंच्या आरोपांना ऊर्जामंत्री बावनकुळेंचं विधानसभेत उत्तर

मुंबई : वीजदरवाढ सरकार करत नाही, मुळात कोणतीही वीजदरवाढ झालेली नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. भाजपमधील सर्वात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भर विधानसभेतच सरकारची कानउघडणी केली. त्यानंतर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी विदर्भातील मंत्री म्हणून विदर्भाकडे जास्त बघतो हा आरोप चुकीचा असल्याचा दावा बावनकुळेंनी केला. उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्राला वीज कनेक्शन देणार नाही, असं नाही. जळगाव जिल्हा आणि शहरासाठी वेगवेगळ्या योजनांमधून आपण निधी देत असल्याचंही बावनकुळे म्हणाले. जून 2017 पर्यंत जळगावमधल्या पायाभूत सुविधा पूर्ण करुन खडसेंच्याच हस्ते उद्घाटन करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यात 1700 कोटींची वीज बिल थकीत आहे. सध्या तरी मुख्यमंत्र्यांनी वीज कनेक्शन कापू नये, असे आदेश दिले आहेत. परंतु आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. बागायतदार आणि निर्यातदार शेतकऱ्यांबाबत वेगळा निर्णय घेण्याचे संकेत त्यांनी दिले. कोणतीही वीजदरवाढ झालेली नाही. वीजदरवाढीबाबत पेपरमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. मुळात मी म्हणजे सरकार दरवाढ करत नाही. MERC म्हणजे महाराष्ट्र वीज नियामक आयोग ही दरवाढ करते, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं. वीज दरवाढ करण्याबाबत सध्या फक्त मागणी केलेली आहे. अद्याप आदेश दिलेले नाहीत, असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं.

खडसेंनी फडणवीस सरकारला झाप झाप झापलं!

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही काय फक्त विदर्भाचे मंत्री आहेत का? विदर्भात 24 तास वीज कनेक्शन देता, जळगावला 14 हजार शेतकऱ्यांनी पैसे भरले, मात्र अजून कनेक्शन का नाही, असा सवाल खडसेंनी विचारला. निवडणुकीत आश्वासन दिलं होतं 24 तास वीज देऊ. पण वीज मुबलक नाही. आपलं सरकार आलं, पण आपण शब्द पाळला पाहिजे, असा खणखणीत सल्लाही खडसेंनी दिला. शेतकऱ्याला रात्री 8 वाजता वीज देता, मात्र शेतकऱ्याने रात्रीच शेतात जायचं का. अधिकाऱ्यांना जाऊन सांगा, रात्री शेतात काही पेरता येतं का, असंही खडसे म्हणाले. शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याचं वीज बिल थकलं असेल, तर व्याज माफ करा, दंड माफ करा. वीज कनेक्शन कट करणार नाही, असं आश्वासन सरकारने द्यावं, असंही खडसे म्हणाले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्राचं भविष्य काय, होणार की नाही. 15 – 15 वर्ष वाट बघायला लावू नका, असाही सल्ला खडसेंनी केला. राज्यभरात औद्योगिक क्षेत्रात किती गुंतवणूक झाली? मुंबई पुणे, नाशिक कॉरिडॉर वगळता उद्योगांची स्थिती काय? उत्तर महाराष्ट्रात एखादं तरी युनिट आलं का , एक कारखना उभा राहिला का याची माहिती द्यावी, असे खणखणीत सवाल, खडसेंनी विचारले. एकनाथ खडसे यांचे घायाळ करणारे पाच प्रश्न
  1. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही काय फक्त विदर्भाचे मंत्री आहेत का? विदर्भाच्या शेतकऱ्याला 24 तास वीज, मग अन्य शेतकऱ्यांना का नाही?
  2. शेतकऱ्याला रात्री 8 वाजता वीज देता, मात्र शेतकऱ्याने रात्रीच शेतात जायचं का, रात्रीची पेरणी करता येईल का?
  3. शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याचं वीज बिल थकलं असेल, तर व्याज माफ करा, दंड माफ करा. वीज कनेक्शन कट करणार नाही, असं आश्वासन देणार का?
  4. राज्यभरात औद्योगिक क्षेत्रात किती गुंतवणूक झाली? मुंबई पुणे, नाशिक कॉरिडॉर वगळता उद्योगांची स्थिती काय?
  5. उत्तर महाराष्ट्रात एखादं तरी युनिट आलं का , एखादा कारखना उभा राहिला का?

महत्त्वाच्या बातम्या

Thane Bhiwandi Accident : काल फ्लॅट बघायला जाताना दुचाकी खड्ड्यात गेली, महिला थेट ट्रकच्या चाकाखाली, आज TDRF चा जवानाचं डिव्हायडरवर डोकं आपटलं, भिवंडीत खड्ड्यांचे बळी
काल फ्लॅट बघायला जाताना दुचाकी खड्ड्यात गेली, महिला थेट ट्रकच्या चाकाखाली, आज TDRF चा जवानाचं डिव्हायडरवर डोकं आपटलं, भिवंडीत खड्ड्यांचे बळी
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Sanjay Raut and Jaykumar Gore: संजय राऊत जयकुमार गोरेंना फक्त येडXXX म्हणाले, मी तर लिंगपिसाट म्हणतो...'; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घणाघाती टीका
संजय राऊत जयकुमार गोरेंना फक्त येडXXX म्हणाले, मी तर लिंगपिसाट म्हणतो...'; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घणाघाती टीका
Chandrashekhar Bawankule: नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची-त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget