राज्यातही 'वंदे मातरम्'सक्ती, राज पुरोहित मागणी करणार
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2017 02:22 PM (IST)
तामिळनाडू पाठोपाठ आता महाराष्ट्रातही शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालयांमध्ये 'वंदे मातरम्'ची सक्ती करावी, अशी मागणी भाजप आमदार राज पुरोहित मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.
मुंबई : मद्रास हायकोर्टाचा कित्ता गिरवत महाराष्ट्रातही आता 'वंदे मातरम्'ची सक्ती होण्याची शक्यता आहे. शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालयांमध्येही हा निर्णय लागू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं भाजप आमदार राज पुरोहित म्हणाले. वेळ पडली तर सभागृहात आवाज उठवेन, असंही राज पुरोहित म्हणाले. काहीच दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी वंदे मातरम् गाण्याची किंवा वाजवण्याची सक्ती केली.