आरोपीने स्वतःच्याच कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचं उघडकीस आलं आहे. आपल्या कुटुंबावर करणी झाल्याचं आरोपी विष्णू चव्हाणने अख्ख्या कुटुंबाला सांगितलं. करणी उतरवायची असल्यास साताऱ्यातील मांढरदेवी गडावर जाऊन अमृत प्यावं लागेल, अशी बतावणी त्याने केली.
मांढरदेवी गडावर कुटुंबातील सहा जणांचं विषप्राशन, तरुणाचा मृत्यू
कथित अमृताच्या नावाखाली विष आरोपीने आई, पत्नी आणि मुलांना पाजलं. विष्णू चव्हाणने हे कृत्य का केलं, याचं कारण अद्याप उलगडलेलं नाही. सुरुवातीला चव्हाण कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता निर्माण झाली होती.
या घटनेत स्वप्निल चव्हाण या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर तृप्ती विष्णू चव्हाण, प्रतिक्षा चव्हाण, सुनिता विष्णू चव्हाण, मुक्ताबाई नारायण चव्हाण सुदैवाने बचावल्या आहेत. विषप्राशन केलेल्या तिघांवर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर दोघांवर वाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.