एक्स्प्लोर
राज्यातही 'वंदे मातरम्'सक्ती, राज पुरोहित मागणी करणार
तामिळनाडू पाठोपाठ आता महाराष्ट्रातही शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालयांमध्ये 'वंदे मातरम्'ची सक्ती करावी, अशी मागणी भाजप आमदार राज पुरोहित मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.

मुंबई : मद्रास हायकोर्टाचा कित्ता गिरवत महाराष्ट्रातही आता 'वंदे मातरम्'ची सक्ती होण्याची शक्यता आहे. शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालयांमध्येही हा निर्णय लागू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं भाजप आमदार राज पुरोहित म्हणाले. वेळ पडली तर सभागृहात आवाज उठवेन, असंही राज पुरोहित म्हणाले. काहीच दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी वंदे मातरम् गाण्याची किंवा वाजवण्याची सक्ती केली.
शाळा-कॉलेजमध्ये 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत सक्तीचं : मद्रास हायकोर्ट
एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी मात्र या मागणीला विरोध दर्शवला आहे. 'कोणतीही विचारधारा कोणावर सोपवू शकत नाही. मी वंदे मातरम् म्हणणार नाही. माझा धर्म, कायदा आणि संविधान मला याची परवानगी देत नाही. माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी बोलणार नाही. विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला तरी विरोध करेन' असं पठाण म्हणाले. मद्रास हायकोर्टाचा निर्णय काय? प्रत्येक शाळा, कॉलेज, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आठवड्यातून किमान एकदा ‘वंदे मातरम्’ गाण्यात/वाजवण्यात यावं (शक्यतो सोमवार किंवा शुक्रवार) सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, फॅक्टरीमध्ये महिन्यातून किमान एकदा ‘वंदे मातरम्’ गाण्यात/वाजवण्यात यावं एखादी व्यक्ती किंवा संघटनेला ‘वंदे मातरम्’ गाताना किंवा वाजवताना अडचणी येत असतील, तर त्यावर सक्ती करता कामा नये.Before You Go
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















