Mukhyamantri Teerth Darshan Yojana: मुंबई : महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरु होऊन गेले आहेत. ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गानं प्रवास करत असतात, याच पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारनं 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) जाहीर केली आहे. 

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30 हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'ची घोषणा केली आहे. 

महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम सुरू केलं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी देशभरातील 73 आणि महाराष्ट्रात 66 धार्मिक स्थळांची यादी केली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ यात्रेची सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं देशभरातील 73 आणि राज्यातील 66 अशा 139 धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच राज्य मंत्रिमंडळानं मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला मंजुरी दिली. या योजनेची माहिती देणारा जीआर रविवारी प्रसिद्ध करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या योजनेची घोषणा केली होती. 

सिद्धीविनायक, चैत्यभूमी, माउंट मेरी चर्च; मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांचाही समावेश 

तीर्थक्षेत्रांमध्ये वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ यात्रा, अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, चार धाम यात्रा, अयोध्येतील राम मंदिर, द्वारकामधील सोमनाथ मंदिर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश होतो. याशिवाय तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातील धार्मिक स्थळं तसेच महत्त्वाच्या बौद्ध आणि जैन स्थळांचाही समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतील 15 धार्मिक स्थळंही या यादीत आहेत. यामध्ये सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी , विपश्यना शिवालय, एक आराधनालय, वांद्रे येथील  माउंट मेरी चर्च आणि सेंट अँड्र्यूज चर्च, याशिवाय नाशिकमधील जैन मंदिर आणि नागपुरातील दीक्षाभूमी, जिथे आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 

दरम्यान, 2.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्याच्या पात्र व्यक्तींना प्रवास, निवास आणि भोजन खर्च कव्हर करण्यासाठी 30 हजार रुपये 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांना जोडीदार किंवा परिजनांसोबत येण्याची परवानगी आहे. राज्यस्तरावर योजनेचं परीक्षण आणि आढावा घेण्यासाठी 17 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सदस्य सचिव म्हणून सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यस्तरावर सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.

महाराष्ट्रातील कोणत्या तीर्थक्षेत्रांचा यादीत समावेश?

सिद्धिविनायक मंदिर सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, मरोळ मॅगेन डेव्हिड सिनेगॉग, भायखळा मयुरेश्वर मंदिर, मोरगाव
महालक्ष्मी मंदिर गोदीजी पार्श्वत मंदिर सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च चिंतामणी मंदिर, थेऊर
चैत्यभूमी दादर नेसेट एलियाहू सिनेगॉग, फोर्ट अग्यारी / अग्निमंदिर गिरिजात्मज मंदिर, लेण्याद्री
माउंट मेरी चर्च (वांद्रे) शार हरहमीम सिनेगॉग, मस्जिद भंडार जोतिबा मंदिर महागणपती मंदिर, रांजणगाव
मुंबादेवी मंदिर भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर, खेड  संत तुकाराम महाराज समाधी मंदिर खंडोबा मंदिर, जेजुरी
वाळकेश्वर मंदिर, मलबार हिल संत चोखामेळा समाधी, पंढरपूर महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर, आळंदी
विश्व विपश्यना पॅगोडा गोराई संत सावतामाळी समाधी मंदिर अरण  जैन मंदिर, कुंभोज गुरु गोविंद सिंग समाधी, हजूर साहिब, नांदेड
चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ विठोबा मंदिर, पंढरपूर रेणुका देवी मंदिर, माहूर खंडोबा मंदिर, मालेगाव
सेंट अँड्र्यू चर्च (वांद्रे) शिखर शिंगणापूर श्री संत नामदेव महाराज देवस्थान उब्रज ता. कंधार
सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च (अंधेरी) तुळजा भवानी मंदिर, तुळजापूर  संत एकनाथ समाधी, पैठण घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, वेरूळ
जैन स्मारके, एलोरा लेणी विघ्नेश्वर मंदिर, ओझर संत निवृत्तीनाथ समाधी, त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, त्र्यंबकेश्वर
मुक्तीधाम सप्तशृंगी मंदिर, वणी काळाराम मंदिर जैन मंदिरे, मांगी-तुंगी
गजपंथ संत साईबाबा मंदिर, शिर्डी सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक शनी मंदिर, शनी शिंगणापूर
श्रीक्षेत्र भगवानगड, पाथर्डी बल्लाळेश्वर मंदिर, पाली संत गजानन महाराज मंदिर, शेगाव एकवीरा देवी, कार्ला
श्री दत्त मंदिर, औदुंबर केदारेश्वर मंदिर वैजनाथ मंदिर, परळी पावस
गणपतीपुळे मार्लेश्वर मंदिर महाकाली देवी  श्री. काळेश्वरी उर्फ काळुबाई मंदिर
अष्टदशभुज (रामटेक)   दीक्षाभूमी   चिंतामणी (कळंब)  

देशातील कोणत्या तीर्थक्षेत्रांचा यादीत समावेश?

वैष्णो देवी मंदिर यमुनोत्री मंदिर, उत्तरकाशी कामाख्यादेवी मंदिर महाकालेश्वर मंदिर, उज्जैन
अमरनाथ गुहा  बैद्यनाथ धाम, देवघर गुवाहाटी ओंकारेश्वर मंदिर, ममलेश्वर मंदिर खंडवा, ब्रह्मपुरी
सुवर्ण मंदिर  काशी विश्वनाथ मंदिर महाबोधी मंदिर  श्री रंगनाथस्वामी मंदिर
अक्षरधाम मंदिर वाराणसी रणकपूर मंदिर, पाली गोमटेश्वर मंदिर
श्री दिगंबर जैन लाल मंदीर  इस्कॉन मंदिर, वृंदावन अजमेर दर्गा विरुपाक्ष मंदिर, हम्पी
श्री लक्ष्मीनारायण मंदीर  श्रीराम मंदिर, अयोध्या सोमनाथ मंदिर, वेरावळ चेन्नकेशव मंदिर, बेलूर
बद्रीनाथ मंदीर  सूर्य मंदिर, कोणार्क द्वारकाधीश मंदिर, द्वारका अन्नपूर्णेश्वरी मंदिर, होरानाडू 
गंगोत्री मंदीर (उत्तरकाशी) श्री जगन्नाथ मंदिर, पुरी नागेश्वर मंदिर, द्वारका महाबळेश्वर मंदिर, गोकर्ण
केदारनाथ मंदीर  लिंगराज मंदिर, भुवनेश्वर सांची स्तूप भूतनाथ मंदिर, बदामी
नीलकंठ महादेव मंदीर  मुक्तेश्वर मंदिर, भुवनेश्वर खजुराहो मंदिर मुरुडेश्वर मंदिर, मुरुडेश्वर
आयहोल दुर्गा मंदिर कांचीपुरम मंदिर, कांचीपुरम रंगनाथस्वामी मंदिर, त्रिची अरुणाचलेश्वर मंदिर
श्रीकृष्ण मंदिर, उडुपी कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम एकंबरेश्वर मंदिर, कांचीपुरम सारंगपानी मंदिर, कुंभकोणम
वीर नारायण मंदिर, बेलावडी किनारा मंदिर, महाबलीपुरम मुरुगन मंदिर, तिरुचेंदूर श्री पद्मनाभस्वामी मंदिर
तिरुपती बालाजी मंदिर गुरुवायूर मंदिर, गुरुवायूर वडक्कुन्नाथन मंदिर, त्रिशूर अटुकल भगवती मंदिर
मल्लिकार्जुन मंदिर, श्रीशैलम पार्थसारथी मंदिर, अरनमुला शबरीमाला मंदिर श्रीकृष्ण मंदिर, गुरुवायूर
बृहदीश्वर मंदिर, तंजावर थिरुनेल्ली मंदिर, वायनाड वैकोम महादेव मंदिर, वर्कला तिरुवल्ला मंदिर, तिरुवल्ला
मीनाक्षी मंदिर, मदुराई शिवगिरी मंदिर, वर्कला श्री सम्मेद शिखरजी  शत्रुजय हिल
रामनाथस्वामी मंदिर गिरनार देवगड पावापुरी
रणकपूर दिलवाडा टेंम्पल उदयगिरी  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

वयोवृद्धांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना'; 30 हजारांचं अनुदानंही मिळणार; पात्र, अपात्रतेचे निकष काय?