Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra :सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज दाखल केला आहे. ही योजना जाहीर झाल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत, अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. याच कागदपत्रांमध्ये हमीपत्र हेदेखील एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करताना तुम्ही हे हमीपत्र जमा न केल्यास तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकते. परिणाम तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. याच कारणामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे हमीपत्र नेमके काय आहे? हे जाणून घेणे गरजेचे आहे. 


हमीपत्र म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? (Ladki Bahin Yojana Hamipatra Mhanje Kay)


 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्हाला एक हमीपत्र द्यावे लागते. हे हमीपत्र म्हणजे एका प्रकारचे स्वयंघोषणापत्र आहे. या हमीपत्राच्या माध्यमातून तुम्ही सरकारला वेगवेगळ्या अटींबाबत हमी देता. त्यामुळे या हमीपत्रातील अटी आणि शर्ती नीट वाचून घेणे गरजेचे आहे. हमीपत्रातील अटी वाचल्यानंतर तुम्हाला प्रत्येक अटीसमोर डाव्या बाजूला दिलेल्या चौकोनात राईट () अशी खून करायची आहे. शेवटी तुम्हाला या हमीपत्रावर सही करावी लागते.


हमीपत्रातील आठ तरतुदी नेमक्या काय आहेत?


हमीपत्राच्या माध्यमातून अर्जदाराकडून एकूण आठ वेगवेगळ्या हमी घेण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.



1) माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही.


2) माझ्या कुटुंबातील सदस्य प्राप्तिकरदाता नाही. 
3) मी स्वत: किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीनंतर घेत नाही. 
4) मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही. 
5) माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार नाही. 
6) माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/ संचालक/ सदस्य नाहीत. 
7) माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही. 
8) माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत. 


विशेष म्हणजे या हमीपत्राद्वारे तुमच्याकडून आधारकार्डसंदर्भात काही परवानग्या घेण्यात येतात. या हमीपत्रात लिहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री  लाडकी बहीण योजनेशी संबंधित असलेल्या पोर्टल अॅपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वत:ला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर अर्जदाराचा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा ओटीपीची माहिती प्रदान करण्यास अर्जदाराची हरकत नाही, असे लिहून द्यावे लागते. तसेच या हमीपत्राद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदाराची ओळख पटावी यासाठी अर्जदाराची आधार क्रमांक वापरण्यास काहीही हरकत नाही, असेदेखील अर्जदाराला लिहून द्यावे लागते.   


हेही वाचा :


लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमकं काय आहे? तिसरी अट वाचा मगच करा सही; अन्यथा...


लाडकी बहीण योजना, ॲपमध्ये कोणकोणती माहिती भरायची? सोप्या टिप्स फॉलो करा, निश्चिंत राहा!