Seafood export Maharashtra: यंदा देशाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन(nirmala sitaraman) यांनी कोळंबी शेती आणि विपणनासाठी सरकार वित्तपुरवठा करणार असल्याचे सांगितल्यानंतर सरकारने कोळंबीवरील मूळ सीमाशुल्क ५ टक्क्यांवर आणले. देशात सागरी खाद्यपदार्थांची निर्यात १७.५४ लाख टनावरून आता १८.१९ लाखांपर्यंत वाढली आहे. ३.७३ टक्क्यांची वाढ नोंदवली असून महाराष्ट्रातून तब्बल १ लाख ७० हजार ७५ टनांची निर्यात होत असल्याचे नुकतेच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले.


मालवाहतूकीचा खर्च वाढल्याची नोंद


यंदा सागरी खाद्यपदार्थांच्या निर्यातीसाठी मालवाहतूकीच्या खर्चात अनेक उद्योगांनी वाढ नोंदवली आहे. केप ऑफ गुड होपमार्गे भारतातून जहाजे घेऊन जाणाऱ्या सीफूड कंटेनरची युद्धनौका वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे निर्यात सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राला ७२० किमीचा सागरी किनारा लाभला असून  सागरी खाद्यपदार्थांची निर्यात वाढल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले.


निर्यात बाजारातील अनेक आव्हानांवर मात करून भारताच्या सीफूड निर्यातीने आतापर्यंतचा निर्यात उच्चांक गाठला आहे. 
भारताला 8,11 किमी पेक्षा जास्त समुद्रकिनारा लाभला आहे ज्यामुळे भारतातील सर्वोच्च सीफूड निर्यातदारांची वाढ झाली आहे. तर महाराष्ट्राला ७२० किमीचा सागरी किनारा लाभला असून  सागरी खाद्यपदार्थांची निर्यात वाढल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले. 


भारतीय नौदलाचे निर्यातीवर लक्ष


भारतीय नौदलाने उत्तर अरबी समुद्रात सागरी पाळत ठेवण्याचे प्रयत्न लक्षणीय वाढले असून लांब पल्ल्याच्या सागरी गस्ती वाढवण्यात आल्या आहेत.सीफूड निर्यातीवर सरकारचे लक्ष असून या निर्यातीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.


भारतातून सीफूडची मागणी कुठे?


दरवर्षी भारतीय सीफूड उद्योग जगभरात सुमारे 13.77.244 टन सीफूड निर्यात करतो. भारतीय सीफूडची प्राथमिक निर्यात ठिकाणे आशिया, मध्य पूर्व, यूएसए, यूके, चीन आणि युरोपीय देश आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि गुजरात ही भारतातील प्रमुख सीफूड उत्पादक राज्ये आहेत. सीफूड निर्यात उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 40% योगदान देतो. 


यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणेमुळे  Zeal Aqua चा स्टॉक 9.27 टक्क्यांनी वाढला, Kings Infra Ventures 8.15 टक्क्यांनी, Coastal Corp 7.55 टक्क्यांनी वाढला, Apex Frozen Foods 7.51 टक्क्यांनी आणि वॉटरबेस BSE वर 5.51 टक्क्यांनी वाढला.


हेही वाचा:


Chief Minister Baliraja Free Power Scheme : मुख्यमंत्री मोफत वीज योजनेचा आदेश अखेर निघाला; कोणाला आणि किती कालावधीसाठी लाभ मिळणार?


मकेची आयात थांबवा, दर वाढवा, राजू शेट्टींची मागणी, वाणिज्य मंत्र्यांसह कृषी मंत्र्यांना लिहलं पत्र