एक्स्प्लोर

'बामु' विद्यापीठातील आमराईत एमफिल-पीएचडी विद्यार्थ्यांची खुरपणी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये 'कमवा आणि शिका' नावाच्या योजनेअंतर्गत एमफिल-पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमराईत खुरपणीला जुंपण्यात आलं आहे.

औरंगाबाद : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये 'कमवा आणि शिका' योजनेचा एक अजब कारभार पहायला मिळत आहे. विद्यापीठाने एमफील, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात खुरुप दिला आहे. या विद्यार्थ्यांकडून आमराई खुरपून घेतली जाते. मराठवाड्याच्या गावागावातून उच्चशिक्षण घेण्यासाठी आलेली गोरगरीब मुलं-मुली खुरपणी करत असताना, विद्यापीठाला कसलंच सोयरसुतक नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात खुरपणी करणाऱ्या तरुणींपैकी कोणी एमएससीचं शिक्षण घेत आहे, तर कोणी एमएचं. कोणी एमफिल करत आहे, तर कोणी पीएचडी. यांच्यावर खुरपणी करण्याची वेळ का आली? 'कमवा आणि शिका' नावाच्या योजनेअंतर्गत या मुलींना आमराईत खुरपणीला विद्यापीठाने जुंपलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठवाड्यातील गोरगरीब विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येतात. घरच्या गरीबीमुळे पुरेसे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी कमवा आणि शिका योजनेत काम करुन शिकतात. गावात आई-वडील इतरांच्या शेतात खुरपणी करतात. त्यांच्या हातातील खुरपं काढण्याची स्वप्न उराशी बाळगून उच्च शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादेत आलेल्या या विद्यार्थ्यांच्या हाती इथल्या विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा खुरपं दिलं. 1978-79 ला 'बामु'मध्ये कमवा आणि शिका योजना सुरु झाली. या योजनेत खरंतर मुला-मुलींना कुशल काम देणं गरजेचं आहे, मात्र इथे विद्यापीठ आमराईतलं गवत काढायला लावतं. खरंतर आता या मुलींची परीक्षा आहे. खुरपणीमुळे यांच्या हातांना जखमा झाल्यात, अशा जखमा घेऊन या पोरी परीक्षा देतात आणि विद्यापीठ महिन्याकाठी कमवा शिकवा योजनेअंतर्गत मुलींच्या हाती 1900 रुपये देतात. विद्यापीठ प्रशासनाने मनात आणलं, तर या विद्यार्थ्यांना क्लेरिकल काम देता येतील. भविष्यात त्यांना याचाही फायदा होईल. पण हे विद्यापीठ बदलायला तयार नाही. निदान आता तरी विद्यापीठाने या विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून थोडं शिकायला हवं. तरच 'कमवा आणि शिका' या योजनेचा खरा लाभ या गोरगरीबांना होईल, अन्यथा त्यांचीही थट्टाच ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget