सातारा शहरातील जुन्या मोटार स्टन्ड परिसरातील दारुच्या दुकानाच्या जागेचा वाद गेले काही दिवसापासून धुमसत आहे. दोन्ही कडचे लोक हे दोन्ही राजेंचे समर्थक असल्यामुळे हा वाद जास्तच चिघळत चालल्याचे दिसून येते. याच वादातून आज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे या दुकानाजवळ जाऊन हे दुकान आजच्या आज तोडा असे म्हणत असताना, काही वेळातच त्या ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही आले आणि या दोन राजेंची समोरासमोर शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरन निर्माण झाले.
काही वेळातच त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र या दोन्ही राजेंना पोलिसांनी जाण्यास विनंती केल्यानंतर दोन्ही राजे येथून निघून गेले. तात्पुरता हा वाद मिटला असला तरी पुढे हा वाद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाहा व्हिडीओ :