जुमलेबाज सरकार, भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील सरकार (Govt) हे जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं.
Supriya Sule : राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाजपचे काम असल्याचे सुळे म्हणाल्या. सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनं केली. मात्र, कधी कॉम्प्रोमाईज केलं नाही असंही सुळे म्हणाल्या.
रक्ताचे नमुने बदलले जात आहेत, असे प्रकार गृहखात्याकडून सुरु असल्याचेही सुळे म्हणाल्या. दूध दराच्या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांचे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. यावर सरकारने तोडगा काढावा असे सुळे म्हणाल्या. हे असंवेदनशील सरकार आहे. लोकप्रतिनिधींना आंदोलन करावं लागतं आहे. आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात तिथे जाणार आहेत.
निलेश लंकेंनी तब्बेतीची काळजी घेतली पाहीजे असेही सुळे म्हणाल्या.
सत्तेत असणारे ब्लॅकचे व्हाइट करण्याची एजन्सी
ट्रिपल इंजिन सरकार काहीही करेल. जे सत्तेत आहेत ते ब्लॅकचे व्हाइट करण्याची एजन्सी झाली असल्याची सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भाजपच्या काही लोकांनी आंदोलन केले, पण कधी कॉम्परोमाईज केलं नाही. हा नवीन भाजप असल्याचे सुळे म्हणाल्या. मुंबई हिट अँड रन प्रकरणावरही सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पोलीस महिलेचे अश्रू सरकारला दिसत नाही का? पुण्यात पेट्रोल अंगावर टाकण्याचा प्रकार घडला, वर्दीची भीती नाही का? असे सवाल सुळे यांनी केले. सरकार काही करु शकत नाही हे त्यांना माहीत आहे. हे भ्रष्टाचाराने बरबटलेलं सरकार आहे. 10 महिन्यांपूर्वी कांद्याच्या धोरणाबाबत माझा युक्तिवाद झाला होता. त्यावेळी पियुष गोयल यांनी आम्ही धोरण बदलणार नाही असे सांगितले होते. आज त्याच्यांच मित्रपक्षाचे उपमुख्यमंत्री कांद्यावर बोलत असल्याचे सुळे म्हणाल्या.
राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं, याला सरकार जबाबदार
डेटा सांगतोय की राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. याला सरकार जबाबदार असल्याचे सुळे म्हणाल्या. मराठा आरक्षणच्या मुद्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारने फसवणूक केली असल्याचे सुळे म्हणाल्या. चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना आम्ही करत असल्याचे सुळे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
पुणे क्राईम कॅपिटल बनतेय, गृहमंत्री काय करतात?; पुण्यातील घटनेवरुन सुप्रिया सुळेंचा संताप, रोहित पवारांचाही सवाल