एक्स्प्लोर

डोंबिवलीत 28 चे 2800 व्हायला वेळ लागणार नाही! सोशल डिस्टन्सिंगवरुन खासदार श्रीकांत शिंदेंची खंत

डोंबिवलीत सध्या 28 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. मात्र, तरीही डोंबिवलीकर अजूनही लॉकडाऊनचं पालन करताना दिसत नसल्याची खंत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केली.

ठाणे : कल्याण डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत असला तरीही डोंबिवलीकर अजूनही लॉकडाऊनचं पालन करत नसल्याची खंत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. त्यामुळे डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण 28 वरुन 2800 व्हायला वेळ लागणार नसल्याचेही ते म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळावे, यासाठी प्रशासनाकडून वारंवार सूचना सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाही. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावर खंत व्यक्त केली.

डोंबिवलीत दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत असून आज हा आकडा 28 वर गेला आहे. मात्र, तरीही डोंबिवलीकर लॉकडाऊनचं पालन न करता सर्रासपणे रस्त्यावर फिरतायत. त्यामुळे 28 चे 2800 व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना डोंबिवलीकरांनी जबाबदारीने वागण्याची गरज असूनही डोंबिवलीकर मात्र आयसोलेशन वॉर्डमधून पळून जातात. हे अतिशय बेजबाबदार वर्तन असल्याचं सांगत खासदार शिंदे यांनी डोंबिवलीकरांचे कान टोचले. सोबतच प्रशासन, पोलीस आणि लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी काम करत असताना तुम्ही पुढचे किमान आठ दिवस तरी घराबाहेर पडू नका, असं हात जोडून भावनिक आवाहन खासदार शिंदे यांनी केलं. त्यामुळं आता तरी सुज्ञ डोंबिवलीकर कोरोनाला गांभीर्याने घेतात का? हे पाहावं लागणार आहे.

Coronavirus | राज्यात कालपासून 113 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 748 वर

राज्यात कोरोनाचा आकडा वाढला आज राज्यात 113 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 748 झाली आहे. आज राज्यात 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी आठजण मुंबईतील, 3 जण पुण्याचे तर प्रत्येकी 1 रुग्ण कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे. कोरोनामुळेमुराज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 45 झाली आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 16008 नमुन्यांपैकी 14837 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 748 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 56 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 46586 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 3122 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

#Coronavirus | कोरोनाबाबत पंतप्रधान मोदींची सोनिया गांधींसह अनेक विरोधा पक्षातील नेत्यांसोबत खलबतं

महत्त्वाच्या बातम्या

महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget