एक्स्प्लोर

उपोषण मागे घ्या, कालव्यात उतरुन भाजप खासदाराने हात जोडले!

सोलापूर : आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी उपोषणासाठी बसलेल्या आंदोलकनांना भेटण्यासाठी भाजपचे खासदार शरद बनसोडे यांना कालव्यात उतरण्याची कसरत करावी लागली. एवढंच नव्हे, तर खासदार बनसोडेंनी आंदोलकांना हात जोडून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सोलापुरात आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी गेले आठ दिवस जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख उपोषणाला बसले आहेत. आठ दिवसांपासून अन्न सेवन न केल्याने देशमुख यांची प्रकृती खालावली. देशमुखांना उपचारासाठी सोलापूरला हलवण्याचा सल्ला स्थानिक डॉक्टरांनी दिला. उपोषण मागे घ्या, कालव्यात उतरुन भाजप खासदाराने हात जोडले! भाजप खासदार शरद बनसोडे एबीपी माझाने प्रभाकर देशमुखांची उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याची बातमी दाखवली. त्यानंतर भाजपचे सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांना जाग आली आणि त्यांनी थेट आंदोलनस्थळ गाठलं. खासदार शरद बनसोडे हे केवळ आंदोलनाच्या ठिकाणी गेले नाहीत, तर ते प्रभाकर देशमुख उपोषण करत असलेल्या कालव्यात कार्यकर्त्यांचा आधार घेत उतरले. इथेही केवळ उतरलेच नाहीत, तर प्रभाकर देशमुखांसमोर हात जोडले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. उपोषण मागे घ्या, कालव्यात उतरुन भाजप खासदाराने हात जोडले! कालव्यात उतरणे, हात जोडून विनंती करणे, हे तर काहीच नाही. याही पुढे जात सत्ताधारी पक्षाचे खासदार असलेल्या शरद बनसोडे यांनी सरकारलाच धारेवर धरलं. खासदार बनसोडे म्हणाले, “सरकारं कोणतीही असोत, ती गेंड्याच्या कातडीचीच असतात. त्यांना हलवण्यासाठी अशी आंदोलनं अनिवार्य असतात. मलाही या विषयावर बोलण्यासाठी पाया पडत फिरावं लागणार आहे. फक्त सरकार आमचं असल्याने थोडं सोपं होईल, हाच तेवढा फरक आहे.” शरद बनसोडे यांच्या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षाचा खासदारच हतबल झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आंदोलकांच्या भेटीसाठी कालव्यात उतरलेल्या खासदार शरद बनसोडे आंदोलनाचा मूळ विषय तडीस नेतील का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vivekanand Patil and Navnath Ban: भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंदने नवनाथ बनला डिवचलं
भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंदने नवनाथ बनला डिवचलं
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
Embed widget