एक्स्प्लोर

मागच्या सुनावणीत एवढा घोळ घातला, आता आमचा विश्वास नाही; मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात संभाजीराजे कडाडले

नांदेड शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयामध्ये आज सकल मराठा समाज व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आले होते.

परभणी : मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडात आज मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात खासदार संभाजीराजे छत्रपती राज्य सरकारवर चांगलेच कडाडले. त्यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधित राज्यातील विद्वानांची समिती गठीत करून सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्याआधी आम्हाला त्या संदर्भातील माहिती सांगा, शिवाय या 420 एमपीएससी पास विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्त्या का नाहीत? याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी द्यावे असं आवाहनही त्यांनी केले.

नांदेड शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयामध्ये आज सकल मराठा समाज व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आले होते. या मेळाव्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह राज्यभरातील विविध मराठा समाजातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होते.

संभाजी राजे छत्रपती यांच्या भाषणानंतर भाषण केलेल्या नरेंद्र पाटलांची जीभ मात्र घसरली. त्यांनी आरक्षणबाबत सरकार वर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली. महत्त्वाचे म्हणजे समोर महिला बसल्या असताना, शिवाय संभाजी राजे छत्रपती यांच्या समोर त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. नरेंद्र पाटील यांनी केलेल्या विधाना बाबत आम्ही संभाजी राजेंना विचारलं असता त्यांनी यावर मात्र मोन बाळगलं.

नरेंद्र पाटलांची खालच्या शब्दात सरकारवर टीका

भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती तेव्हा राज्यात मूक मोर्चे काढण्यात आले. मात्र कुणालाही अडवण्यात आले नाही. आज तुम्ही कोल्हापूरमध्ये परिषद घेतली की अडवता. पंढरपूरमध्ये मशाल मोर्चा काढला त्यांना आडवता, का तुमची फाटली आहे का? हवा गेली नालायक साले असल्या शब्दात उपस्थित महिलांसमोर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. शिवाय या सरकारने मराठा मुलांची इतकी गंभीर अवस्था केलीये की एमपीएससीच्या मुलांचे फोन येत आहेत. साहेब आम्ही जीव द्यावा म्हणून मला जर परवानगी असते तर तलवारीने तीन-चार जणांना मी भोसकलं असतं, असं गंभीर विधानही नरेंद्र पाटील यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
एप्रिल मे मध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, मंत्री नितेश राणेंचा दावा, म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसच राहणार, आम्ही राज ठाकरेंना नाराज करणार नाही 
एप्रिल मे मध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, मंत्री नितेश राणेंचा दावा, म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसच राहणार, आम्ही राज ठाकरेंना नाराज करणार नाही 
महायुतीमध्ये सतत वाद! कृषीमंत्री भरणे म्हणाले, हे वाद खाली, वरती मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री भक्कम
महायुतीमध्ये सतत वाद! कृषीमंत्री भरणे म्हणाले, हे वाद खाली, वरती मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री भक्कम
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
Embed widget