एक्स्प्लोर

आम्हाला शिवभक्ती शिकवू नये, रायगडावरील रोषणाई प्रकरणी संभाजीराजे भडकले

रायगडावर केलेली रोषणाई नक्कीच योग्य आणि महाराजांचा सन्मान ठेवणारी नव्हती. मात्र यासाठी पुरातत्व विभागाने शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मार्गदर्शन करणे गरजेचे होते . मात्र भावना चांगली आहे म्हणून काहीही चालवायचे का? असा सवाल संभाजीराजेंनी केला.

पंढरपूर : रायगडावरील रोषणाई प्रकरणी खासदार संभाजीराजे भडकले. आम्हाला शिवभक्ती शिकवू नये, माझा रोष पुरातत्व खात्यावर मात्र किल्ले रायगडावरून कुणी राजकीय आरोप केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशाराच संभाजीराजेंनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिला.

शिवजयंतीच्या दिवशी किल्ले रायगडाला केलेल्या विद्युत रोषणाईवरून राजकीय आरोप करणाऱ्यांवर आज संभाजीराजे भडकले. मी भाजपाची शाल पांघरून फिरत नाही, किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी मी गेले अनेक वर्षे दिवसरात्र झटत असताना माझ्यावर कोणी राजकीय शेरेबाजी केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशारा आज संभाजीराजे यांनी पंढरपूरमध्ये दिला. रायगडावर केलेली रोषणाई नक्कीच योग्य आणि महाराजांचा सन्मान ठेवणारी नव्हती. मात्र यासाठी पुरातत्व विभागाने शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मार्गदर्शन करणे गरजेचे होते . मात्र भावना चांगली आहे म्हणून काहीही चालवायचे का? असा सवाल संभाजीराजेंनी केला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत मी कोणतेही विधान केले नव्हते. तर माझा सर्व रोष पुरातत्व विभागावर होता. नेहमी शांत आणि संयमी अशी देशाला ओळख असलेले संभाजीराजे छत्रपती हे दुखावले गेल्याने आज त्यांचे वेगळेच रूप पंढरपूरमध्ये पाहायला मिळाले. मी एखाद्या पक्षाचा खासदार असलो तरी मी आजवर एकजरी फायदा घेतल्याचे दाखवून दिल्यास लगेच राजीनामा देईन, अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली.

गेल्या काही वर्षांपासून किल्ले रायगडाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आता समोर येत असल्याचे सांगताना किल्ल्यावरील एक दगड हलवायलाही जे पुरातत्व खाते परवानगी देत नाही त्यांनी विद्युत रोषणाईला कशी परवानगी दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. किल्ले रायगडावर भसाड पद्धतीची रायगडाला शोभेशी रोषणाई करणे अपेक्षित असून यासाठी आता आमच्या प्रयत्नाला यश येत आहे, असे सांगितले. श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता त्यांना पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची ओळख मीच करून दिली होती, असे राजेंनी सांगितले.

आमच्या फोर्ट फेडरेशनकडून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याची राजधानी ते जलदुर्ग मार्गे राजांची राजधानी असा टुरिझम डेव्हलप करायचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले . पुरातत्व विभाग माझ्या ताब्यात द्यावा, असेही संभाजीराजे यांनी सांगितले. देशातील कृषी कायदे चुकीचे नसून त्यात काही बदल करणे गरजेचे आहे मात्र आता या शेतकऱ्यांशी योग्य संवाद साधून गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न मिताने गरजेचे असल्याचेही संभाजीराजे यांनी सांगितले.

शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या डिस्को रोषणाई वरून खा. संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याला फटकारलं

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
MPSC News : एमपीएससीच्या नऊ परीक्षांसंदर्भात चौकशी; निवेदने प्रतिज्ञापत्राच्या विहित नमुन्यात सादर करण्याचे आवाहन
एमपीएससीच्या नऊ परीक्षांसंदर्भात चौकशी; निवेदने प्रतिज्ञापत्राच्या विहित नमुन्यात सादर करण्याचे आवाहन
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Embed widget